सुभाषचंद्र बोस जयंती : १ लाखांच्या नोटीवर होती सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |


नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात आपल्या क्रांतिकारी विचारांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली. सुभाषचंद्र बोस यांची आज १२२ वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाषचंद्र बोस संग्राहालयाचे बुधवारी सकाळी उद्घाटन केले. दिल्लीच्या लाल किल्ल्यात स्थित आझाद हिंद सेनेच्या वस्तूंचे हे संग्राहालय आजपासून सर्वांसाठी खुले झाले आहे.

 
 

 

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ साली ओडीशा येथील कटक येथे झाला. घरची परिस्थितीही तशी संपन्न होती. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्याच्या लढाईत योगदान देऊ इच्छित होते. १९२१ मध्ये प्रतिष्ठीत नोकरी सोडून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. देशप्रेमाने झपाटून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्यावर त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे युवावर्गाचे व्यापक समर्थन मिळाले. त्यानंतर त्यांनी आझाद हिंदू फौजेची स्थापना केली. ‘तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा’, हा देशप्रेमाचा नारा दिला.
 
 

 
 

१९४२ मध्ये त्यांनी हिटलरची भेट घेतली होती. त्याने भारताच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ कोणतेही पाऊल उचलले नाही. हीटलरने दिलेल्या वचनात तसे कोणतिही स्पष्टता नव्हती. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारला जर्मनी, जपान, फिलीपीन्स, कोरिया, चीन, इटली, आयरलॅंण्ड सरकारने मान्यता दिली होती. आझाद हिंद सरकारने १९४३मध्ये आझाद हिंद बॅंकेची स्थापना केली होती. या बॅंकेने १० रुपयांपासून ते १ लाखापर्यंत चलन छापले होते. एक लाखांच्या नोटेवर सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा होती.

 

 
 

१८ ऑगस्ट १९४५ मध्ये तायवान येथील विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे इतिहास सांगतो. मात्र, बोस या अपघातातून बचावले, असेही म्हटले जाते. भारत सरकारने त्यांच्या संबंधित माहिती घेण्यासाठी बराच पाठपुरावा केला मात्र, काहीच हाती लागले नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक कहाण्या सांगितल्या जातात मात्र, त्यांना पुरावा काहीच नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@