लोकसभेपूर्वी प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |
 

नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राजकीय खेळी केली आहे. प्रियांका गांधी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असून आता त्यांच्यावर उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे.


उत्तर प्रदेशातील कॉंग्रेससमोरचे तगडे आव्हान पाहता ही मोठी जबाबदारी मानली जात आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशातच आहेत. सपा आणि बसपा यांनी यापूर्वीच युतीची घोषणा केली आहे. भाजपचे सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशमधून निवडणून आले आहेत. त्यामुळे हे तगडे आव्हान पेलण्यासाठी प्रियांका गांधींना राजकारणात सक्रीय व्हावे लागत आहे.

 
 
 
 

काँग्रेसने येथे दोन सरचिटणीस नियुक्त केले आहेत. यानुसार उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे. एक फेब्रुवारीपासून प्रियांका गांधी आपली जबाबदारी सांभाळतील. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा असून भाजपविरोधात कॉंग्रेस वगळता इतर विरोधकांनी एकजूट केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@