कॉंग्रेसमध्ये कुटूंब हाच पक्ष तर भाजपमध्ये पक्ष हेच कुटूंब; नरेंद्र मोदींचा कॉंग्रेसवर प्रहार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |



गडचिरोली : 'भारतीय जनता पक्षात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्ष स्तरावर चर्चा केली जाते. एखाद्या कुटूंबाला काय हवे त्यावरून राजकीय निर्णय होत नाहीत. त्यामुळे देशात बहुतांश पक्षात कुटुंब हाच पक्ष आहे, असे म्हटले जाते. मात्र, भाजपमध्ये पक्ष हेच कुटुंब मानले जाते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशाबाबत वक्तव्य केले.

 

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गडचिरोलीत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेसची सर्व सुत्रे ही गांधी कुटूंबियांनी एकटवली आहेत, असा घणाघात केला. भारतीय जनता पक्ष हा लोकशाही तत्वावर चालणारा पक्ष असल्याचे ते म्हणाले.

 

बुधवारी प्रियांका गांधी-वाड्रा यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेसने उत्तरप्रदेशमध्ये दोन सरचिटणीस नियुक्त केले आहेत. यानुसार, उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्याकडे आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेश (पूर्व) या विभागाची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ८० खासदार आहेत, त्यामुळे ही जबाबदारी महत्वाची मानली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@