…असा केला पंतप्रधान मोदींनी नेताजींचा सन्मान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२२ व्या जयंती निमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान मोदींना नेताजींची टोपी भेट दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वत: वापरलेली ही टोपी आहे. हा अमूल्य ठेवा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस कुटुंबियांचे आभार मानले. नेताजींच्या टोपीच्या रुपातील हा अमूल्य ठेवा जतन करता यावा. यासाठी पंतप्रधान मोदींनी तातडीने लाल किल्ल्यातील क्रांती मंदिर गॅलरीत ही नेताजींची टोपी ठेवली. देशातील तरुणांनी क्रांती मंदिराला भेट देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी. असे मोदींनी म्हटले आहे.
 
 
 
 

‘याद-ए-जालियान’ या संग्रहालयाचेही उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले. जालियनवाला बाग आणि पहिल्या महायुद्धातील भारतीय सैनिकांना हे संग्रहालय समर्पित करण्यात आले. १८५७ साली झालेल्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित संग्रहालयाचेही उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. भारतीय कलेचे दर्शन घडविणाऱ्या ‘द्रिशाकला’ या लाल किल्ल्यामधील संग्रहालयाचे उद्घाटनदेखील यावेळी पंतप्रधान मोदींनी केले. सुभाषचंद्र बोस संग्रहालय आणि भारतीय राष्ट्रीय सेना संग्रहालय या दोन्ही संग्रहालयांमध्ये स्वातंत्र्य सेनानी आणि स्वातंत्र्य चळवळींशी संबंधित विविध कलाकृती आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@