हिंदू महिलेने मुस्लिम पुरूषाशी केलेला विवाह अनियमित!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : हिंदू महिलेने मुस्लिम पुरुषांशी केलेल्या विवाहासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हिंदू महिलेने मुस्लिम पुरुषांशी केलेला विवाह अनियमित असून अशा वैवाहिक संबंधांपासून जन्मलेला मुलगा नियमित असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. एका सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी न्यायालयाने सांगितले की, हिंदू महिलेने मुस्लिम पुरुषांशी विवाह केल्यास ती तिच्या नवऱ्याच्या संपत्तीची हकदार असू शकत नाही. मात्र, या विवाह संबंधातून जन्मलेला मुलगा त्याच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगू शकतो.

 

काय आहे प्रकरण?

 

केरळ हायकोर्टाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आली होती. यामध्ये इलियास व वल्लियाम्मा या दाम्पत्याचा मुलगा शमसुद्दीन याने आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवर दावा केला होता. यावर आक्षेप घेत त्याच्या चुलत भावाने कोर्टाकडे धाव घेतली होती. यावर केरळ उच्च न्यायालयाने शमसुद्दीनच्या बाजूने निकाल देत म्हटले होते की, शमसुद्दीन आपल्या वडिलांच्या संपत्तीत वाटेकरी होऊ शकतो.

 

न्यायालयाचे नेमके म्हणणे काय?

 

केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एनवी रमन आणि एमएम शांतगोदर यांच्या खंडपीठाने म्हटले की, "आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत कीमुस्लिम व्यक्ती मूर्तीपूजा किंवा अग्नीची पूजा करणाऱ्या व्यक्तीशी विवाह करू शकते. पण ती व्यक्ती तिच्या नवऱ्याच्या संपत्तीची हकदार असू शकत नाही. मात्र तिला पोटगीचा दावा करता येऊ शकतो. तर अशा विवाहातून जन्माला आलेल्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे." 

 

मुस्लिम पुरुषाचा मूर्तीपूजक किंवा अग्नी उपासक अर्थात हिंदू वा पारशी स्त्रीबरोबर झालेला विवाह हा पूर्णतः व्हॉइड (पोकळीस्त) नसून केवळ अनियमित असतो. मुस्लिम धर्म विवाहाची नियमित, अनियमित व पोकळीस्त अशी तीन विभागांत वर्गवारी करतो. अनियमित विवाहातून झालेले अपत्य औरसच असते त्यामुळे तो वारसाहक्कास पात्र असतो. न्यायालयाच्या ह्या अन्वयार्थाने अशा विवाहांतून जन्माला आलेल्या अपत्यांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळाला आहे.

- विभावरी बिडवे, कायदे अभ्यासक 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@