गांधी कुटुंबाच्या निकटवर्तुळात के. सी. वेणुगोपाल यांचा उदय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
नवी दिल्ली : काँग्रेसने केलेल्या या नियुक्त्यांमध्ये स्वाभाविकपणे प्रियांका गांधी-वडरा यांच्या नियुक्तीची चर्चा सर्वाधिक होते आहे. मात्र, सरचिटणीस (संघटन) म्हणून खासदार के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्तीही लक्षवेधी ठरली आहे. अशोक गेहलोत यांच्या जागी करण्यात आलेल्या या नियुक्तीमुळे काँग्रेसमधील गांधी कुटुंबियांच्या निकटवर्तीय वर्तुळात वेणुगोपाल यांचा प्रभावशाली उदय झाल्याचे दिसत आहे.
 
के. सी. वेणुगोपाल हे काँग्रेसचे केरळमधील अलप्पुळा येथील खासदार असून संपुआ-२ सरकारच्या काळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवले आहे. सध्या काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी असलेल्या वेणुगोपाल यांनी सध्या चर्चेत असलेल्या कर्नाटक विधानसभेतील ‘ऑपरेशन लोटस’च्या विरोधात काँग्रेसअंतर्गत सूत्रे हलवण्यात व ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात महत्वाची भूमिका निभावल्याचे म्हटले जाते. तसेच, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून आणण्यातही वेणुगोपाल यांनी पडद्याआडून महत्वाची भूमिका निभावली आहे. तसेच, के. सी. वेणुगोपाल हे राहुल गांधी यांच्या नव्या ‘टीम राहुल’चा भाग असल्यानेच, त्यांची आता काँग्रेस पक्षसंघटनेतील अतिशय महत्वाच्या अशा पदावर नियुक्ती केल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ‘करो या मरो’ स्थितीत असताना वेणुगोपाल काय भूमिका निभावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
 

ज्योतिरादित्य शिंदेंना नुकसानभरपाई

 

नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत खा. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. तथापि, मुख्यमंत्रीपद मात्र ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यामुळे कमालीचे नाराज झालेल्या ज्योतिरादित्य यांना सरचिटणीस म्हणून पश्चिम उत्तर प्रदेशसारख्या महत्वाच्या भागाचे प्रभारीपद देऊन त्यांची एक प्रकारची नुकसानभरपाईच राहुल गांधी यांनी केल्याचे दिसत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@