माहित नसलेले बाळासाहेब 'टायगर' ठाकरे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |


 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांचा काही कमी उल्लेखित असलेल्या गोष्टी जाणून घेऊया...


- बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय राजकारणी तर होतेच, सोबतच ते एक उत्तम व्यंगचित्रकार देखील होते.

 

 
 

- त्यांनी त्यांच्या भाषणांसोबतच व्यंगचित्रातूनही जनतेच्या मनात एक वेगळा ठसा उमटवला होता.

 

- ५०च्या दशकामध्ये त्यांची सामाजिक भाष्य करणारी व्यंगचित्रे खूप गाजली होती.

 

 
 

- त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले.

 

- १९५०मध्ये त्यांनी 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत होते, त्याचसोबत त्यांनी विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे काढली.

 

 
 

- १९६०मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःचे व्यंगचित्रात्मक 'मार्मिक' नावाचे साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे 'मार्मिक' हे नाव त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचवले होते.

 

 
 

- महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. नावाप्रमाणेच, सामाजिक, राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे हे साप्ताहिक होते.

 

- 'मार्मिक' आणि 'सामना'चे संपादक म्हणून महाराष्ट्रात दबदबा असणारे बाळासाहेब ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍यामया पाक्षिकाचे संपादक असून ते मुलांसाठी खास व्यंगचित्रे रेखाटायचे.

 

 
 

- त्यानंतर १९ जून १९६६ रोजी बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि त्यांचा राजकीय कालखंडाला सुरुवात झाली.

 

- पक्षाचे काम सांभाळूनदेखील बाळासाहेबांनी व्यंगचित्राची कला जोपासून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

 

 
 

'हिंदूहृदयसम्राट' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त महा MTBकडून विनम्र अभिवादन...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@