देशाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेला जागतिकस्तरावर पसंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2019
Total Views |


 

गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्यात भारताचा जगात चौथा क्रमांक

 
 

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट घोंगावत असतानाही भारतसारख्या विकसनशील देश गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. वर्ल्ड इकॉनोमिक फोरमया वार्षिक सर्वसाधारण सभेत पीडब्ल्यूसी या जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्थेने जाहीर केलेल्या वर्ल्ड इन २०५०या अहवालात २०१९ मध्ये भारताचा विकासदर ७.६ टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरत असल्याचे पीडब्ल्यूसीने म्हटले आहे.

 

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या पहिल्या दिवशी हा अहवाल सादर करण्यात आला. यात चीनकडे गुंतवणूकदारांना ओढा कमी होत असल्याचे म्हटले आहे. जगातील एकूण ९१ देशांच्या तेराशे कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात गुंतवणूकदारांचे अमेरिकेकडे २७ टक्के गुंतवणूकदारांचे आकर्षण आहे पूर्वी हा आकडा ४६ टक्क्यांवर होता. चीनकडे २४ टक्के गुंतवणूकदारांचा ओढा कायम आहे. जर्मनीचीही टक्केवारी २० ट्क्क्यांवरुन १३ टक्क्यांवर घसरली आहे.

 

१५ टक्के जणांनी बाहेरील आकर्षक गुंतवणूक बाजारापेठांचा तितका अंदाज नसल्याचेही म्हटले आहे. अमेरिका, चीननंतर भारत आणि जर्मनी हे दोनच देश गुंतवणूकीसाठी आकर्षक असल्याचे मत गुंतवणूकदारांनी व्यक्त केले आहे. पीडब्ल्युसीच्या अहवालात भारत हा गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा मोठा देश असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रेग्झिटमुळे युनायटेड किंग्डमला मागे सोडत जपानच्या अर्थव्यवस्थेने घोडदौड सुरू ठेवली आहे.

 

जागतिक अर्थव्यस्था येत्या वर्षभरात मंदीच्या सावटाखाली असेल, असे मत ३० टक्के उद्योजकांनी व्यक्त केले आहे. गेल्या वर्षात ५७ टक्क्यांनी झालेली आर्थिक वृद्धी २९ टक्क्यांवर येणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. पीडब्ल्युसीचे अध्यक्ष बॉब मॉर्टीज यांच्यामते जगभरातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणातून आलेल्या अहवालामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा जगासमोर आला आहे. जगातील अन्य आर्थिक सर्वेक्षणातुनही ही बाब उघडकीस आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@