हॅकरच्या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते : रविशंकर प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीवर आरोप करणारा कार्यक्रम आणि ती पत्रकार परिषद काँग्रेसप्रणित होती, असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. सोमवारी एका आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाने घेतलेल्या बैठकीमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन सायबर एक्सपर्ट सय्यद शूजाने अनेक खुलासे केले होते.

भाजपच्यावतीने केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या प्रकरणी कॉंग्रेसवर पलटवार केला. रविशंकर प्रसाद यांनी लंडन येथे झालेल्या पत्रकार परिषदे अनेक प्रश्न प्रकट केले. त्या पत्रकार परिषदे काँग्रेस नेते कपिल सिब्बल काय करत होते, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

 
 
 

काँग्रेसच्या वतिने तो संपूर्ण कार्यक्रम हाताळत होते, असा गंभीर आरोपही प्रसाद यांनी केला भाजप निवडणूक जिंकते तेव्हाच ईव्हीएम मशीन हॅक केली जाते का?, मग मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या निवडणूकांवेळी काय झाले, असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी विरोधकांना विचारला. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@