माधवन साकारणार शास्त्रज्ञ नंबी नारायणांचा बायोपिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : इस्रोतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रॉकेटरी : द नंबी इफेक्ट’ असे या सिनेमाचे नाव आहे. अभिनेता आर. माधवन हा शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शनदेखील माधवन करत आहे. आजवर चाहत्यांनी माधवनला एक अभिनेता म्हणून भरभरून प्रेम दिले. आता एक दिग्दर्शक म्हणून आर. माधवनला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याजोगे असेल! दिग्दर्शनासाठी माधवनने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांच्या शुभेच्छा मागितल्या होत्या.
 
 

 
 

“शास्त्रज्ञ नंबी नारायण हे कोण आहेत? त्यांचे कार्य काय आहे? या गोष्टी जवळपास ९५ टक्के भारतीयांना माहित नसणे, हा माझ्यादृष्टीने एकप्रकारे गुन्हा आहे. असे आर. माधवन याने या म्हटले. एका वृत्तवाहिनीला या सिनेमाविषयी दिलेल्या मुलाखतीदरम्यान माधवनने हे वक्तव्य केले. इस्रोतील गोपनीय माहिती पैशांसाठी परकीय देशांना विकण्याचा आरोप शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांना अनेक वर्षांसाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. गेल्या वर्षी न्यायालयाने याप्रकरणी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची निर्दोष सुटका केली. २०१८ मध्ये शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी ‘रेडी टू फायर : हाऊ इंडिया अँड आय सर्व्हाइव्ड द इस्रो स्पाय केस’ या पुस्तकाद्वारे आपला अनुभव जगासमोर मांडला होता.

 

 
 

शास्त्रज्ञ नंबी नारायण यांचा वयवर्षे २७ पासून ते ७० पर्यंतचा जीवनप्रवास या ‘रॉकेटरी : द नंबी इफेक्ट सिनेमात दाखविण्यात आला आहे. माधवनचे तीन वयोगटातील वेगवेगळे लूक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेता आर. माधवनने खूप मेहनत घेतली आहे. भूमिकेबदद्ल अभ्यास करण्यासाठी माधवनला दोन वर्षे लागली. शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्यासारखी केशभूषा करण्यासाठी माधवनला १४ तास एका खुर्चीत बसून राहावे लागले होते. माधवनने भूमिकेसाठी दाढी आणि केस वाढवले असून ते पांढरे केले आहेत. केस रंगवतानाचा व्हिडिओ माधवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला.

 
 
 

शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी या भूमिकेसाठी अभिनेता आर. माधवनला मार्गदर्शन करण्यासाठी ‘रॉकेटरी’च्या सेटवर आले होते. यादरम्यान सिनेमाच्या सेटवर माधवन आणि शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी अनेक फोटो काढले. माधव नंबी नारायण याच्या भूमिकेत इतका हुबेहुब दिसत आहे की या फोटोंमधील खरे शास्त्रज्ञ नंबी नारायण कोण आणि माधवन कोण हा फरक ओळखणे कठीण आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सिमरन आणि आर.माधवन ‘रॉकेटरी’ या सिनेमाच्या निमित्ताने १७ वर्षांनी पुन्हा एकत्र काम करत आहेत. याआधी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची भूमिका अभिनेता मोहनलाल साकारणार होते. परंतु त्यांच्या इतर सिनेमांच्या चित्रिकरणात ते व्यस्त असल्याने माधवनने ही भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलले. सिनेमाचे चित्रिकरण सुरु असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@