जगातील सर्वात वयोवृद्ध माणसाचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |



ओशोरे : जगातील सर्वात वयोवृद्ध अशी ख्याती असलेले जपानचे मसाजो नोनाका यांचे राहत्या घरी निधन झाले. ते ११३ वर्षांचे होते. जपानमधील ओशोरे येथे त्यांचे वास्तव्य होते. मसाजो यांचा जन्म २५ जुलै १९०५ रोजी झाला होता. २०१८मध्ये त्यांनी वयाची ११२ वर्षे आणि २५९ दिवस पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून नोंद झाली.

 

निकटवर्तीयांच्या माहितीनुसार मसाजो यांना गोड पदार्थ खायला आवडत होते. त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्यदेखील गोड खाणे असल्याचे त्यांनी सांगितलेही होते. त्यांचे कुटुंबीय गेल्या चार पिढ्यांपासून 'हॉट स्प्रिंग इन' चालवतात. मसाजो यांना सात भावंडे, पत्नी आणि पाच मुले होती. पाचपैकी चार मुलांचे याआधी वृद्धापकाळाने यापूर्वीच निधन झाले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@