३० हजार कोटींनी वाढले रिलायन्सचे बाजारमुल्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचे बाजारमुल्य गेल्या तीन दिवसांत ३० हजार कोटींनी वाढले आहे. यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीतील निकाल आणि अन्य तीन अहवाल कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. शेअर बाजारातील दलालांनी खरेदीची उत्सूकता दर्शवल्याने सोमवारी शेअर ४ टक्क्यांनी वाढला. यामुळे कंपनीचे बाजारमुल्य ३० हजार कोटींनी वधारले. गेल्या आठवड्यात हे मुल्य ७.८० लाख कोटींवर पोहोचले आहे.

 

शेअर बाजारातील दलाल कंपनी सीएलएसएने गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत तो १५०० रुपयांपर्य़ंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी तो ५०.६५ अंशांनी वधारत १२३५ रुपयांवर कामगिरी करत होता. सीएलएसएच्या अंदाजानुसार, जीओची गिगाफायबर सेवा जून २०१९ पर्यंत प्रमुख शहरांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे कंपनीचे कर्ज २५ अब्ज डॉलरपर्यंत कमी होण्याची चिन्हे आहेत.

 

नॉमुरा या वित्तीय संशोधन संस्थेने रिलायन्स शेअर खरेदीचा सल्ला देत शेअर १४८० रुपयांवर पोहोचेल, कमोडीटीतील नफ्यात घसरण होऊनही रिलायन्सने उत्तम कामगिरी केली आहे. रिफायनरीतून कमी नफा होत असूनही रिलायन्स समुहातील अन्य कंपन्यांची कामगीरी चांगली आहे. आरकॉमसह विलिनीकरण शक्य झाल्यास कंपनीला त्याचाही फायदा होऊ शकतो. सिटी या संशोधन संस्थेनेही रिलायन्सचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. रिलायन्सने ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीतील निकालात ८.८ टक्के वाढ नोंद केली होती. तिमाहीत १० हजार २५२ कोटींचा नफा कमावणारी रिलायन्स एकमेव खासगी कंपनी ठरली होती. गेल्या वर्षाच्या तिमाहीत नफा ९ हजार ४२० कोटी होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@