मोदींना आव्हान देणारा एकही नेता देशात नाही : राम माधव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |



श्रीनगर : केंद्रातील एनडीए आणि मोदी सरकारचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार असून आता निवडणुका तोंडावर आहेत. विरोधकांनी महाआघाडीची तयारी केली असली तरीही, भाजप पुन्हा एकदा सत्तेत परतेल, असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला.

 

नरेंद्र मोदींना आव्हान देईल असे साहस आणि क्षमता विरोधकातील कोणत्याच नेत्यात नसल्याचेही ते म्हणाले. राम माधव म्हणाले, की नरेंद्र मोदींना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही ठोस कारण नाही. सर्व विरोधी पक्षांकडे एकही नेता नाही, ज्याच्याकडे मोदींसारखे साहस आणि क्षमता आहे. सर्व विरोधी पक्ष मिळूनही मोदींना हरवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 
 

भारतीय जनता पक्ष २०१९ मध्ये आधीपेक्षा चांगली कामगिरी करेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी मिळून आताच्या जागांपेक्षा जास्त जागा मिळविण्यात यशस्वी होईल. माधव म्हणाले, की अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@