लष्कर-ए-तोयबा’च्या अतिरेक्याला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |
 
 

जयपूर : जयपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली.

 

मोहम्मद हुसैन, असे या दहशतवाद्याचे नाव असून हुसैन हा राजस्थानच्या नागौर येथे राहणारा आहे. त्याचे अनेक दहशतवादी संगठणांसोबत संबंध आहेत. टेरर फंडिंग करण्यात याचा महत्वाचा हात असावा, असा एनआयएला संशय आहे. देशविरोधी अनेक घटनांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता, असे म्हटले जात आहे.

 

तर, देशाच्या अनेक ठिकाणी आक्षेपार्ह व भडकाऊ भाषण करण्याचे आरोप त्याच्यावर आहे. हुसैन हा दुबईच्या विमानाने जयपूरला येत आहे, अशी माहिती एनआयएला मिळाली. त्यानुसार जयपूर पोलिसांसोबत मिळून त्यांनी सापळा रचण्यात आला. जयपूर विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली. या दहशतवाद्याची एनआयए कसून चौकशी करणार आहे. त्याच्याजवळून महत्वाच्या गुप्त माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@