विवेकानंद केंद्रास भारत सरकारचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी या संस्थेस भारत सरकारतर्फे देण्यात येणारा २०१५ या वर्षासाठीचा ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. विवेकानंद केंद्राने ग्रामविकास, शिक्षण तसेच नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धन आणि विकासासाठी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार जाहीर करणायत आला असून या पुरस्काराबद्दल विवेकानंद केंद्राचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

केंद्र सरकारतर्फे महात्मा गांधींच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १९९५ पासून ‘गांधी शांतता पुरस्कार’ देण्यात येत आहे. रुपये १ कोटी, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा केंद्र सरकारने २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ या वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये २०१८ साठी निपॉन फाउंडेशनचे योहेई सासाकावा, २०१७ साठी एकल अभियान ट्रस्ट, २०१६ साठी अक्षयपात्र फाउंडेशन व २०१५ साठी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील व सरन्यायाधीश रंजन गोगोई, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपचे ज्येष्ठ नेते खा. लालकृष्ण अडवाणी या सदस्यांच्या समितीने एकमताने या पुरस्कारांची निवड केली. यामध्ये ग्रामीण भागातील विकासात्मक कार्य, शैक्षणिक कार्य व नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन व विकासासाठी केलेल्या कार्यासाठी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी या संस्थेला २०१५ चा पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

विवेकानंद केंद्राने कधीच पुरस्काराची अपेक्षा ठेऊन काम केले नाही. पूर्वोत्तर भारतात केंद्राने जे काम केले त्याचा उपयोग हा भाग उर्वरित भारताशी संलग्न राहण्यात झाला, हे सर्वांनीच मान्य केले आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कामाला आळा घालण्याचे काम विवेकानंद केंद्राच्या शाळांमुळे झाले. पूर्वोत्तर भागात आज केंद्राच्या शाळांचे नाव आदराने घेतले जाते. शिलास्मारकाच्या स्थापनेला ५० वे वर्ष सुरू होत असताना केंद्र सरकारने या कार्याची दखल घेतली आणि हा पुरस्कार जाहीर केला ही बाब खूपच आनंददायी आहे.

 

सुधीर जोगळेकर, मराठी प्रकाशन विभाग प्रमुख, विवेकानंद केंद्र

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@