मध्यप्रदेशात चार भाजप कार्यकर्त्यांची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |


मध्यप्रदेश : गेल्या दहा दिवसांत चार भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. रविवारी बडवानीतील भाजप मंडलाचे अध्यक्ष मनोज ठाकरे यांची निर्घृण हत्या झाली. ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

 

रविवारी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या मनोज ठाकरे यांना दगडाने ठेचण्यात आले. सोमवारी त्यांच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड आढळला. पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप गुन्हेगारांचा शोध लागलेला नाही.

 
 
 
 

दरम्यान, रविवारी संध्याकाळी गुना भागात परमाल कुशवाह नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली. परमाल भाजपाचे संयोजक शिवराम कुशवाह यांचा नातेवाईक होता. या मागे कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

 

प्रल्हाद बंधवार या मंदसौर नगरपालिकेच्या माजी अध्यक्षांची हत्या झाली. ही घटना गुरुवार, दि. १७ डिसेंबर रोजी घडली. सायंकाळी सात वाजता जिल्हा सहकारी बँकेसमोर भाजपा नेते लोकेंद्र कुमावत यांच्या दुकानात बसले होते. तिथून बाहेर पडताच दुचाकीस्वारांनी त्यांना गोळ्या घातल्या.

 

बुधवारी संध्याकाळी इंदूरमधील व्यावसायिक आणि भाजप नेते संदीप अग्रवाल यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. अद्याप या हल्लेखोरांना अटक झालेली नाही. विशेष म्हणजे शहरातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या चौकात ही हत्या झाली. ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या भागापासून पोलीस स्टेशन अवघे शंभर मीटर अंतरावर आहे. अग्रवाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@