...म्हणून व्हायरल झाले #10YearChallenge

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून #10YearChallenge सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्या सर्व अबालवृद्धांना या #10YearChallenge ची भुरळ पडली आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी या #10YearChallenge अंतर्गत स्वत:चे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जगभरातील सेलिब्रिटींनादेखील या #10YearChallenge चा मोह आवरता आला नाही. आतापर्यंत सुमारे ५० लाखांहून अधिक सोशल मीडिया यूजर्सनी या चॅलेंजअंतर्गत आपले दहा वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु हे #10YearChallenge व्हायरल होण्यामागे फेसबुकचा हात असून असे करण्यामागे फेसबुकचा छुपा हेतु आहे. असे मत तंत्रज्ञान क्षेत्रातील काही तज्ञांनी व्यक्ते केले आहे.
 

#10YearChallenge सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील काही तज्ञांनी या चॅलेंजमागील मुख्य हेतुबाबत प्रश्न उपस्थित केले. अनेक तज्ञांच्या मते फेसबुक #10YearChallenge जाणूनबुजून व्हायरल करत आहे. या चॅलेंजद्वारे फेसबुक आपल्या युजर्सचा डेटा गोळा करत आहे. असा आरोप फेसबुकवर काही तज्ञांकडून केला जात आहे. इन्स्टाग्राम हे फेसबुकच्या मालकीचे असल्याने त्यावरील #10YearChallenge पोस्ट्सचा डेटा गोळा केला जात आहे. फेसबुक यूजर्सचे दहा वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटोंचा वापर हा फेसबुकच्या आगामी फेस रेकग्नेशन सॉफ्टवेअरसाठी केला जाणार आहे. असे तज्ञांचे म्हणणे आहे.

 
 
 
 

हे फेस रेकग्नेशन सॉफ्टवेअरचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित मशीन लर्निंगसाठी फेसबुक करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच हा डेटा फेसबुक थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सला विकणार असल्याची भीती तज्ञांनी वक्त केली आहे. ‘वायर्ड’ या मासिकातील सदर लिहिणाऱ्या लेखिका केट ओनील हिने सर्वांत आधी #10YearChallenge विषयी प्रश्न उपस्थित केला होता. ट्विटरच्या माध्यमातून केटने ही माहिती सोशल मीडिया यूजर्सना दिली. #10YearChallenge च्या आधारे यूजर्सचा सर्व डेटा आणि त्यांच्या वयासंदर्भातील माहिती फेसबुक फेस रेकग्नेशन सॉफ्टवेअरच्या अल्गोरिदमला मजबूत करण्यासाठी वापरू शकते. असे ट्विट केटने केले होते. केटच्या या ट्विटला जगभरातून ११ हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले. २४ हजारांहून अधिक ट्विटर यूजर्सनी केटच्या या ट्विटला लाईक करून तिच्या मताशी सहमती दर्शविली आहे.

 

दरम्यान, ‘वायर्ड’ या मासिकासाठी लिहिलेल्या एका लेखात केटने असे नमूद केले आहे की, #10YearChallenge च्या व्हायरल ट्रेंडमुळे आतापर्यंत फेसबुककडे यूजर्सच्या गेल्या दहा वर्षांपासून आतापर्यंतच्या फोटोंचा एक चांगला डेटाबेस तयार झाला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंड्सच्या माध्यमातून यूजर्सचा डेटा गोळा करण्याचा फेसबुकचा प्रयत्न नसेलही. परंतु गेल्या काही वर्षांत यूजर्सचा डेटा मिळविण्यासाठी अॅप्लिकेशन्स आणि व्हायरल चॅलेंजेसचा आधार घेतला गेल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर कॅंब्रिज अॅनालिटिका प्रकरणामध्ये फेसबुकवरून ७ कोटी अमेरिकन नागरिकांचा डेटा चोरण्यात आला होता. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यामातून संवाद साधताना आपण कोणती माहिती देत आहोत, ती माहिती कशाप्रकारे वापरली जाऊ शकते. याचा विचार करणे गरजेचे आहे.

 

एनवाययू स्टर्न बिझनेस ऑफ स्कूलमधील प्राध्यापिका अॅमी वेब यांनीही काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना #10YearChallenge मागील हेतुबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मशिन लर्निंग सॉफ्टवेअरला खाद्य पुरविण्यासाठी #10YearChallenge हे एक उत्तम साधन आहे. #10YearChallenge द्वारे फेसबुकच्या मशिन लर्निंग सॉफ्टवेअरला यूजर्सच्या दिसण्यामधील लहानशा बदलांचाही बारकाईने अभ्यास करता येईल. फेसबुकने मात्र या सगळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@