करिना कपूर खानला काँग्रेसकडून उमेदवारी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
भोपाळ : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नवी खेळी खेळली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भोपाळमधून अभिनेत्री करिना कपूर खानला उमेदवारी देण्याचा डाव काँग्रेसकडून रचला जात आहे. भोपाळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. अभिनेत्री करिना कपूर खानला उमेदवारी देऊन तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार असल्याचे कळते.
 

करिना कपूर खान ही पतौडी घराण्याची सून असल्याने जुन्या भोपाळमध्ये उमेदवारीसाठी या गोष्टीचा फायदा करून घेण्याचा विचार सध्या काँग्रेस करत आहे. करिनाला उमेदवारी दिली तर महिलांचाही पाठिंबा मिळेल, अशी शक्कल काँग्रेसने लढवली आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते गुडड् चौहान आणि अनीस खान यांनी ही मागणी केली असून लवकरच ते या मागणीसाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार आहेत. एका वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे. पतौडी कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये स्थायिक आहे. सैफ अली खान, सोहा अली खान शर्मिला टागोर आणि करिना यांनी अनेकदा भोपाळला भेट दिली आहे.

 

१९९१ मध्ये मंसुर अली खान पतौडी यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ भोपाळमधील काँग्रेस नेत्यांची ही मागणी मान्य करणार का? ही मागणी मान्य झाली तरी करिना कपूर खान लोकसभा निवडणूक लढवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडे आता लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नेतेच उरलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसने आपला मोर्चा आता अभिनेत्यांकडे वळवला आहे. अशी प्रतिक्रिया भोपाळमधील भाजपचे खासदार आलोक संजय यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@