'खेलो इंडिया'त महाराष्ट्र अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019
Total Views |


 


पुणे - खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करत पदकांची कमाई केली. एकूण ८५ सुवर्ण, ६२ रौप्य आणि ८१ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्र संघ २२८ पदकांसह अव्वल क्रमांक पटकावला आहे. गेल्या वेळी महाराष्ट्राने ३६ सुवर्णपदके पटकावली होती. हरियाणाने ३८ सुवर्णपदके पटकावून पदकतक्त्यात अव्वल स्थान मिळविले होते. या वेळी महाराष्ट्राने हरियाणाला मागे टाकले.

 
 
 

महाराष्ट्राने सर्वाधिक १८ सुवर्णपदके पटकावली ती जलतरणात. त्यात मिहीर आंब्रे, युगा बिरनाळे, केनिशा गुप्ता, अपेक्षा फर्नांडिस, वेदांत बापना, करिना शांक्ता यांनी ठसा उमटविला. जिम्नॅस्टिक्समध्येही आपला ठसा उमटविला. जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने १४ सुवर्णपदके पटकावली. त्यात आदिती दांडेकर, अरिक डे, सिद्धी-रिद्धी या जुळ्या हत्तेकर भगिनींनी आपली छाप पाडली. अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने १३ सुवर्ण पटकावली. वेटलिफ्टिंग व बॉक्सिंगमध्ये प्रत्येकी ९ सुवर्ण, खो-खोमध्ये ४ सुवर्ण मिळाली, मात्र कबड्डीत निराशा झाली. महाराष्ट्राला एकही सुवर्ण मिळविता आले नाही. एकेकाळी कुस्तीत दबदबा निर्माण केलेल्या महाराष्ट्राला केवळ चार सुवर्णपदके मिळाली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@