सिग्नल शाळेला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘युगांतर’ पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |



ठाणे : महाराज सयाजीराव विद्यापीठ, बडोद्याच्या 'द इंस्टीट्युट ऑफ लिडरशिप अँण्ड गव्हर्नस' च्यावतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘युगांतर’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी यावर्षी सिग्नल शाळेची निवड झाली आहे. विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेत २७ जानेवारी २०१९ रोजी बडोदा येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या परिषदेत भटू सावंत यांना 'युथ हिरो' म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसमोर सिग्नल शाळा प्रयोगाचे सादरीकरण देखील करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युगांतर सोहळ्याला व त्यांच्या पुरस्कार प्राप्त प्रयोगांचे शुभेच्छा संदेश देऊन विशेष कौतुक केले आहे.

 

महाराज सयाजीराव विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी देशभरातील अभिनव प्रयोग व त्यात काम करत असलेल्या तरुणांना राष्ट्रीय युवा परिषदेत युगांतर पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा २५ जानेवारी ते २७ जानेवारीदरम्यान ही राष्ट्रीय परिषद बडोदा येथे होत असून यात देशभरातील १२ तरुण व त्यांच्या अभिनव प्रयोगांचा गौरव करण्यात येणार आहे. याआधी या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. राजेंद्र सिंग, डॉ. जयप्रकाश नारायण आदी वक्त्यांनी परिषदेला संबोधित केले आहे. यावेळी वंचितांच्या शिक्षणाचा 'ठाणे पॅटर्न सिग्नल शाळा' या विषयावर भटू सावंत सादरीकरण करणार आहेत.

 

राष्ट्रीय युवा परिषद दरवर्षी एका विषयाला समर्पित असते. यावर्षीचा विषय राष्ट्र असून राष्ट्रबांधणीच्या कामात योगदान देणाऱ्या प्रयोगांची निवड यंदा करण्यात आली आहे. या प्रयोगांमध्ये सिग्नल शाळेची निवड झाली आहे. ऑल इंडिया अँटी टेरिरिस्ट फ्रंटचे प्रमुख मनिंदरजीत सिंग बिट्टा यांच्या उपस्थितीत सिग्नल शाळेला सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर या परिषदेत माजी आर्मी स्टाफ प्रमुख तसेच अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल जे.जे. सिंह, दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिर्वसिटीचे कुलगुरु डॉ. योगेश सिंह, पत्रकार शेहजाद पुनावाला, श्वेता ब्रह्म भट, विनय बत्राळे आदी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युगांतर सोहळ्याला व त्यांच्या पुरस्कार प्राप्त प्रयोगांचे शुभेच्छा संदेश देऊन विशेष कौतुक केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@