सिडनी कसोटीसाठी संघ जाहीर ; संघात तीन बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |


 


सिडनी : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटी सामना जिंकून मालिकेमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता चौथा कसोटी सामना सिडनी येथे होणार असून त्यासाठी भारताने संघ जाहीर केला आहे. यामध्ये तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. इशांत शर्माला विश्रांती देण्यात आली आहे तर रोहित शर्माने माघार घेतली आहे. चौथा कसोटी सामना ७ जानेवारीला सिडनी मैदानावर खेळवला जाणार आहे.

 

सिडनी येथे होणाऱ्या सामान्याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. विराटचा संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटीमध्ये धूळ चारतो का? की ऑस्ट्रेलिया संघ मालिकेमध्ये बरोबरी करून स्वतःची प्रतिष्ठा अबाधित ठेवतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारताने आतापर्यंत येथे ११ कसोटी सामने खेळले असून केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. इतर ५ सामने अनिर्णित तर ५ सामन्यांत पराभव झाला आहे.

 

रोहित शर्मा 'या' कारणामुळे संघाबाहेर

 

रोहित शर्माला कन्यारत्न झाल्यामुळे तो मायदेशी परतला आहे. त्यामुळे त्याने सिडनी येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामान्यामधून माघार घेतली आहे. रोहित शर्माने यापूर्वीच एका मुलाखतीत आपण बाबा होणार असल्याचे स्पष्ट केले होते. रोहित शर्माने त्याची स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेल्या रितिका सजदेहसोबत १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतर रोहित शर्मा-रितिका आई-बाबा झाले आहेत.

 

भारतीय संघ

 

विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, आर. अश्विन , मोहम्मद शामी, बुमराह आणि उमेश यादव

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@