क्रिकेटगुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |


 
 
 
 
मुंबई : क्रिकेट जगतातील देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेटमधील द्रोणाचार्य हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
 

१९३२ साली रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म झाला होता. १९४३ पासून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. २०१० साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. क्रिकेट प्रशिक्षणातील कार्यासाठी त्यांना मानाच्या अशा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दादर येथील शिवाजी पार्क येथे त्यांनी कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. आपल्या क्रिकेट प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक क्रिकेट घडवले. सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, विनोद कांबळी यासारख्या क्रिकेटपटूंना त्यांनी प्रशिक्षण दिले होते. आचरेकर सरांचा हा क्लब त्यांची मुलगी कल्पना मुरकरने सुरु ठेवला आहे.

 
 
 

"रमाकांत आचरेकर यांनी केवळ क्रिकेटपटू घडवले नाहीत, तर त्याचबरोबर त्या क्रिकेटपटूंना एक चांगला माणूस म्हणून देखील घडवले आहे." अशा शब्दांत बीसीसीआयने त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@