पुणे हेल्मेट सक्ती ; ७ हजार ४९० वाहनचालकाना दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |



पुणे - नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यावर कडक कारवाई करत वाहतूक पोलिसांनी पहिल्याच दिवशी तब्बल ७ हजार ४९० वाहनचालकाना दंड ठोठावला. दरम्यान, यापुढेही हेल्मेट कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असे शहर वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

शहरात हेल्मेट सक्ती असल्याने हेल्मेट धारकांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात नव्यावर्षात हेल्मेटसक्ती केली जाणार, असे आदेश दिले होते. त्यामुळे मंगळवारपासून हेल्मेट न घालणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. परंतु, हेल्मेटसक्ती नको असा सूर स्थानिकांकडून उमटत आहे. हेल्मेट घालून सुद्धा अपघात झाला तर काय करायचा असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

 

शहरातील चौकाचौकात पोलीस कर्मचाऱ्यांकडून हेल्मेट न घालण्यावर कारवाई केली जात आहे. ३१ डिसेंबरचा बंदोबस्त असल्याने १ जानेवारीला त्यातुलनेने कमी पोलीस बळ रस्त्यावर होते. मात्र, २ जानेवारी पासून ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल, पुण्यात हेल्मेट वापरणाऱ्याचे प्रमाण १५ टक्के आहे. पोलीस कारवाई होणार असल्याने यात वाढ होऊन हे प्रमाण ३० टक्के झाले असल्याचे वाहतूक पोलीस उपयुक्तांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@