नव्या वर्षाचे स्वागत 'या' चित्रपटांनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : नवीन वर्ष सुरु झाले की प्रतीक्षा असते ती मोठमोठ्या बँनरखाली बनणाऱ्या चित्रपटांची. परंतु यावेळी हिंदीमध्ये कुठलाही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नाही आहे. ४ जानेवारीला नव्या वर्षाचा पहिला शुक्रवार आणि त्यावेळी फक्त "भाई- व्यक्ती की वल्ली" हा पु.ल. देशपांडेंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची चर्चा आहे. किमान १ आठवडा तरी या चित्रपटाची जादू कायम राहील अशी आशा आहे.

 

"भाई ; व्यक्ती की वल्ली"

 

महेश मांजरेकर दिग्दर्शित "भाई - व्यक्ती की वल्ली" हा पु.ल. देशपांडेंच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट ४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेता सागर देशमुख यांनी तारुण्यातील पु.ल. साकारले आहेत. त्यासोबतच विजय केंकरे, सक्षम कुलकर्णी, इरावती हर्शे, सतीश आळेकर, अश्विनी गिरी, सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे ई. अशी भलीमोठी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

 

"बंबलबी" इंग्रजी

 

मराठीप्रमाणेच बंबलबी हा इंग्रजी चित्रपटही ४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी भाषेत प्रदर्शित होत असून 'ट्रान्सफॉर्मर्स' मालिकेतील हा एक भाग आहे. अशा अॅक्शन चित्रपटांसाठी भारतीय प्रेक्षकांकडे नेहमीच चांगले मार्केट म्हणून पाहिले जाते.

 

सचिन पिळगावकरांचा 'सोहळा'

 

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि सचिन पिळगावकर अभिनित सोहळा हा मराठी चित्रपटही ४ तारखेला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सचिन पिळगावकरांसह शिल्पा तुळसकर, विक्रम गोखले, लोकेश गुप्ते आणि मोहन जोशी हेदेखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका करताना दिसतील.

 

११ जानेवारीला होणार हे चित्रपट प्रदर्शित

 

११ जानेवारीला हिंदीमध्ये 'उरी', 'अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' तर मराठीमध्ये 'लाव यु जिंदगी', 'फाईट' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे 'भाई' चित्रपटासाठी हा १ आठवडा खूप महत्वाचा ठरणार आहे.

 

'सिम्बां'ची जादू अजूनही कायम

 

रोहित शेट्टीचा 'सिंम्बा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामे करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने आठवड्याभरात अंदाजे ५० कोटींच्यावर कामे केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@