गृहकर्ज घेणाऱ्यांमध्ये राज्य अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |


मुंबई : पंतप्रधान आवास योजना, परवडणारी घरे आदीं प्रकल्पातून राज्यातील नागरिकांचे स्वप्न सत्यात उतरत असल्याचा अहवाल क्रिफ हाय मार्क या संस्थेने दिला आहे. या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गृहकर्ज घेण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून देशातील एकूण गृहकर्जांपैकी निव्वळ २५ टक्के कर्ज ही महाराष्ट्रातील आहेत. शहरी भागात घरे घेण्यासाठी घेतलेल्या कर्जांमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा पहीला तर ठाण्याचा दुसरा आणि पुण्याचा तिसरा क्रमांक आहे.

 

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात शहरीकरणाचा वेग हा सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यातील आयटी हबमध्ये गृहकर्जांची सर्वाधिक मागणी असल्याचेही या अहवालातून उघड झाले आहे.

 

दरम्यान आर्थिक चणचण भासणाऱ्या आणि चलन तरलता कमी असणाऱ्या कर्जपुरवठा क्षेत्राला गृहकर्जांनी तारले आहे. देशातील गृहकर्ज देण्याऱ्या कंपन्या आणि बॅंकांची वर्षभरात १६.८ टक्क्यांनी प्रगती झाली आहे. सरकारी बॅंकांकडून देण्यात येणाऱ्या गृहकर्जाचे प्रमाण ४१.१ टक्के आहे, तर यातील गृहकर्ज वितरण कंपन्यांचा ३८.७२ टक्के आहे. खासगी क्षेत्रातून १६.०५ ट्क्के वित्तपुरवठा केला गेला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@