राहुल गांधींवर जेटलींचा पलटवार, ‘लहान मुलाला तरी कळतं’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : राफेल करारावरून कॉंग्रेसने संसदेत गदारोळ घालणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर अरुण जेटलींनी जोरदार हल्ला चढवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असतानाही राहुल गांधी हा वादाचा मुद्दा बनवत आहेत.

 

ते म्हणाले, राफेल खरेदीमध्ये संपूर्ण प्रक्रियेचे पालन झाले आहे. राफेल खरेदी करण्यापूर्वी ७४ बैठका झाल्या होत्या. २०१६ मध्ये सरकारने डासूबरोबर राफेल खरेदीचा करार केला. २००१ पासून भारतीय हवाई दल राफेल विमानांची मागणी करत आहे. काँग्रेसप्रणीत संपुआपेक्षा २० टक्के स्वस्तात राफेल व्यवहार झाला आहे.

 

राहुल गांधी धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी जारी केलेली कथित ऑडियो क्लिपही बनावट आहे. मनोहर पर्रिकरांनीही ही ऑडियो क्लिप बनावट असल्याचे म्हटले आहे. गेल्या सहा महिन्यात राफेल प्रकरणी राहुल गांधींनी वापरलेला प्रत्येक शब्द खोटा आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी संसदेत मा-बेटा चोर है, अशा घोषणाही देण्यात आल्या. राहुल गांधींना फायटर विमानातील काही कळत नाही. त्यांना केवळ पैशातलं कळत, असा आरोपही त्यांनी लगावला.

 

कारगिल युद्धानंतर राफेल विमानांची देशाला गरज आहे. ही विमाने १०० ते १५० मीटर उंचीवरून अचूक हल्ला करू शकतात. त्यामुळे तेव्हा जर ही विमाने भारताकडे असती तर तसे करणे शक्य झाले असते. कॉंग्रेस आघाडीने राफेल करार पूर्ण केला नाही, हा देशाशी खोटेपणा केल्यासारखे आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी राहुल गांधींवर लगावला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@