आवास योजनेतील लाभार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |
 

पंतप्रधान आवास योजनेतील घरांना ब्रास वाळू – मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
 

मुंबई : पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीलोकसंवादकार्यक्रमात केली. ठाणे जिल्ह्यातील दहिवलीचे कैलास धुळे, लातूरमधील बाबूराव साधू कांबळे, नागपूर जिल्ह्यातील खैरी पिंजेवाड येथील दर्शना सोलंकी, नाशिकमधील नंदा पाडेकर या लाभार्थ्यांशी त्यांच्या नव्या घराच्या ठिकाणी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला व घराच्या सुंदर बांधकामाबद्दल लाभार्थ्यांचे कौतुक केले. या लाभार्थ्यांनी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विष्णू राऊत यांनी राज्य व केंद्र शासनामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याच्या भावना व्यक्त करून आपल्या नव्या घरास भेट देण्याचे निमंत्रणच थेट मुख्यमंत्र्यांना दिले.

 

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसंवादकार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात बुधवारी राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांद्यापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.

 

पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेचा लाभ घेताना कोणत्या अडचणी आल्या, अनुदान वेळेत मिळाले का, शौचालयाचे बांधकाम केले का, आदी प्रश्नांची उत्तरे त्यांनी या कार्यक्रमात जाणून घेतली. अनुदान थेट बँकेतून मिळत असल्यामुळे राज्य शासनाच्या योजना जलद गतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या असल्याच्या व त्या पारदर्शकपणे राबवित असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. राज्य शासनाने राबविलेल्या योजनांमुळे पक्क्या व सुंदर घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचेही या लाभार्थ्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. घरकुलाबरोबरच उज्ज्वला योजना,शौचालय योजनांचा लाभही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

वर्धा तालुक्यातील आरती कोट्टेवार व गडचिरोली जिल्ह्यातील फुलेवाडा येथील जावेद शेख यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधताना रेती मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याची घोषणा केली. तसेच यासंबंधी सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सूचना देण्यात येणार असल्याचेही सांगितले.

 

या योजनेतील घरांच्या आराखड्यासाठी घेण्यात येणारे शुल्क माफ करण्यासंदर्भात केंद्र शासनाशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे अमरावतीतील आशा जामजोड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@