२०१९ मध्ये येणार ‘हे’ ऐतिहासिक सिनेमे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
मुंबई : २०१९ हे वर्ष बॉलिवुडसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण यावर्षी अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यामुळे पिरियड ड्रामाचा ट्रेंड यावर्षी बॉलिवुडमध्ये पाहायला मिळेल. ऐतिहासिक घटनांवर आधारित यापैकी काही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा अजून कळल्या नसल्या तरी त्यांची स्टारकास्ट निश्चित करण्यात आली आहे.
 

पृथ्वीराज चौहान
 

 


 
 

यशराज फिल्मसच्या बॅनरखाली पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर सिनेमा येणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून अभिनेता अक्षयकुमार या सिनेमात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे.

 
 

केसरी

 
 

 
 
 
 

२०१९ हो वर्ष अभिनेता अक्षयकुमारसाठी खास असेल यात शंका नाही. कारण, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स सोबत अक्षयकुमारचा ‘केसरी’ हा सिनेमादेखील याच वर्षी प्रदर्शित होत आहे. अनुराग सिंह या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. सारागढीच्या लढाईवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाचे चित्रिकरण जोधपूरमध्ये करण्यात आले. अभिनेत्री परिणिती चोप्राची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. हवालदार ईशर सिंह यांची भूमिका अक्षयकुमारने साकरली आहे. नुकतेच या सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले. हा सिनेमा जबरदस्त अॅक्शनप असणार आहे. भूमिकेत प्राण ओतण्यासाठी अक्षयकुमारने तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. केसरी हा सिनेमा यावर्षी २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

 
 

पानीपत

 
 
 

 
 

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ‘पानिपत’ हा ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्जुन कपूर, क्रिती सेनन,संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. अभिनेता अर्जुन कपूर या सिनेमामध्ये सदाशिव भाऊ राव यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री क्रिती सेनन ही या सिनेमात पार्वतीबाईंची भूमिका साकरत आहे. १७६१ मध्ये झालेल्या मराठा सैन्य आणि अफगाण सेनानी अहमद शहा अब्दाली यांच्यात पानिपतची तिसरी लढाई झाली होती. मराठ्यांच्या शौर्याची गाथा या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. ६ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत असून अभिनेता अर्जुन कपूर या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ऐतिहासिक सिनेमात काम करणार आहे.

 

तख्त

 
 

 
 

‘तख्त’ हा सिनेमा पुढील वर्षी २०२० मध्ये प्रदर्शित होणार असला तरी त्याचे चित्रिकरण हे २०१९ मध्येच केले जाणार आहे. करिना कपूर खान, रणवीर सिंह, अनिल कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट, भूमि पेडेणेकर, विकी कौशल अशी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. करण जोहर या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. मुघल सिंहासनाची कथा ‘तख्त’ या ऐतिहासिक सिनेमात दाखविण्यात येणार आहे. अभिनेता विकी कौशल या सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकरणार आहे. तर अभिनेत्री जान्हवी कपूर ही औरंगजेब बादशाहाच्या बेगमची भूमिका साकरणार आहे. अभिनेत्री करिना कपूर खान ही रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारत असून आलिया भट त्याच्या प्रेयसीची भूमिका साकरत आहे. विकी कौशल आणि रणवीर सिंह हे दोघे शाहजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या भूमिकेत दिसतील.

 
 

मणिकर्णिका

 
 

 
 
 

कंगना रनोतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा याच महिन्यात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षी सतत या ना त्या कारणाने हा सिनेमा चर्चेत होता. झाशीची राणी लक्ष्मीबाई या वीरांगनेच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री अंकिता लोखंडे झलकारीबाईची भूमिका साकारणार आहे. विजेंद्र प्रसाद यांनी ‘मणिकर्णिका’ची कथा लिहिली आहे. याआधी त्यांनी ‘बाहुबली’ सिनेमाचे कथालेखन केले होते.

 

कलंक

 
 
 

 
 

याचवर्षी १९ एप्रिल रोजी करण जोहरचा ‘कलंक’ हा सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे २०१९ करण जोहरसाठी खूप काही घेऊन येणार आहे. कलंक या सिनेमाची कथा भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित असून अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दिक्षित ही जोडी या सिनेमात तब्बल २१ वर्षांनी एकत्र दिसणार आहे. वरुण धवन आणि आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर या जोड्यादेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. करण जोहरने ट्विटरवरून या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करून याबद्दल माहिती दिली. अभिषेक वर्मन या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून साजिद नाडियावाला या सिनेमाची निर्मिती करत आहे. अभिषेक वर्मन यांनी यापूर्वी ‘२ स्टेट्स’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

 

भारत

 
 

 
 
 

यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या भारत या सिनेमाची गेल्या वर्षभरापासून चर्चा होती. भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित हा सिनेमा आहे. अभिनेत्री कतरिना कैफची या सिनेमात प्रमुख भूमिका असणार आहे. वरुण धवन पाहुणा कलाकार म्हणून यात दिसेल. दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर आणि तब्बू यांच्यादेखील ‘भारत’मध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या कोरियन सिनेमाचा हा रिमेक आहे.

 

शमशेरा

 
 

 
 

५०-६० च्या दशकातील एका दरोडेखोराची कथा ‘शमशेरा’मध्ये दाखविण्यात येणार आहे. अभिनेता रणबीर कपूर ‘शमशेरा’ची भूमिका साकारत असून संजय दत्त आणि वाणी कपूर हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

 

सैय्यद अब्दुल रहीम

 
 

 
 

५० च्या दशकातील सुप्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांच्या बायोपिकमध्ये अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे. बोनी कपूर या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

 

चाणक्य

 

 
 
 

अभिनेता अजय देवगण चाणक्यांची भूमिका साकरणार असल्याची माहिती त्याने ट्विटरवरून शेअर केली होती. नीरज पांडे या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून सिनेमाच्या कथेवर सध्या काम सुरु आहे. ऐतिहासिक सिनेमा नसून एका मॉर्डन चाणक्याची ही कथा असू शकते. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@