म.रे. कोलमडली ; सायनजवळ तांत्रिक बिघाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |



मुंबई : नवीन वर्ष आणि ३१ डिसेंबरच्या जल्लोषानंतर बुधवारी कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मध्य रेल्वेच्या अडथळींचा सामना करावा लागला. सायन रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लोकल अर्धा ते १ तास उशिराने धावत होत्या. दुपारी १२ पर्यंत वाहतूक सुरळीत झाली नसून लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वादात आहे.

 

सकाळच्या सुमारास सायन रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे याचा परिणाम लोकलच्या फेऱ्यांवर झाला. या प्रकारामुळे लोकलचे वेळापत्रक सकाळीच कोलमडले होते. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतूक सुमारे अर्धा ते १ तास उशिराने धावत आहेत. बिघाड नेमका काय झाला, ते मात्र अजून समजू शकले नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@