विद्यार्थ्यांनी बनवले खेलो इंडिया ॲप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी मंत्रालयात 'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ॲपचे अनावरण करण्यात आले. 'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी खास बनविण्यात आलेल्या टीव्हीसी आणि जिंगलचेही अनावरण यावेळी करण्यात आले.

 

यावेळी शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे, आ. मंगलप्रभात लोढा, आ. राजेंद्र पाटनी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'खेलो इंडिया'च्या महाराष्ट्र संघाला शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी खेलो इंडिया उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. खेलो इंडिया स्पर्धा दि. ९ ते २० जानेवारी या कालावधीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे- बालेवाडी येथे होणार आहेत. या स्पर्धेत एकूण १८ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स, ज्युडो,नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, फूटबॉल, हॉकी,कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या खेळांमध्ये विविध खेळाडू सहभागी होणार आहेत.

 

'खेलो इंडिया' मोबाईल ॲप

 

खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना, प्रेक्षकांना या स्पर्धेबाबत पूर्ण माहिती मिळावी यासाठी हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपमध्ये खेलो इंडिया युथ गेम्सची पूर्ण माहिती असून खेळाचे संपूर्ण वेळापत्रक यामध्ये आहे. तसेच महत्त्वाचे संपर्क, वाहतूक व्यवस्था याबाबतची माहिती यामध्ये उपलब्ध असून पुणे शहर आणि आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ॲपवर स्पर्धेची पदकतालिका दररोज उपलब्ध करण्यात येणार आहे.

 

खेलो इंडियाचे फेसबुक पेज

 

खेलो इंडिया युथ गेम्सची सर्व माहिती आणि अपडेटस मिळावेत याकरिता फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. http://facebook.com/kheloindiapuneअशी लिंक आहे.

 

खेलो इंडियावर चित्रफित आणि जिंगल

 

खेलो इंडिया युथ गेम्सच्या प्रसिद्धीसाठी आणि खेळाडूंमध्ये उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने जिंगल तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध स्पर्धेच्या पदक विजेत्या खेळाडूंवर चित्रफित तयार करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@