डॉ. आनंदीबाई जोशींचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आनंदी गोपाळ’ असे या सिनेमाचे नाव आहे. डॉ. आनंदीबाई जोशी या त्यांच्या कार्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. परिस्थितीशी समाजाशी लढून आनंदीबाई जोशी यांनी शिक्षण घेतले.
 

आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्या बोटीने परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या होत्या. त्या काळात त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. परंतु आनंदीबाई जोशी यांनी डॉक्टर होण्यासाठी केलेल्या संघर्षामुळे वैद्यकीय क्षेत्राची कवाडे स्त्रियांसाठी खुली झाली.

 
 
 

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, असे म्हणतात. पण डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या कर्तुत्वामागे त्यांचे पती गोपाळराव जोशी यांचीदेखील मेहनत होती. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी आनंदीबाई आणि गोपाळरावांचे लग्न झाले होते. लग्नानंतर मी आनंदीबाईंना माझ्या मनाप्रमाणे शिक्षण देईन. अशी अट गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या वडिलांना घातली होती. आनंदीबाईंच्या शिक्षणाच्या मार्गामध्ये आजींची अडचण नको, म्हणून गोपाळरावांनी आपली बदली कोल्हापूरात करून घेतली होती.

 

कोल्हापूरमध्ये तेथील मिशनऱ्यांशी त्यांची ओळख वाढली. त्यानंतर आनंदीबाईंना शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवावे असा विचार गोपाळरावांनी केला. परंतु शिक्षणाच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या या जोडप्याला त्याकाळी समाजाचा रोष पत्करावा लागला होता. अनेक अपमानास्पद बोल त्यांना सुनावले गेले होते. परंतु याकडे दुर्लक्ष करून आनंदीबाई मन लावून अभ्यास करत होत्या. आनंदीबाई आणि गोपाळरावांचा हा जीवनप्रवास या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. आनंदीबाईंची भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी ‘आनंदीगोपाळ’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/



@@AUTHORINFO_V1@@