पनवेल-रोहा मेमू शनिवारपासून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2019
Total Views |



पनवेल : पनवेलहून ठाणे-मुंबईकडे आणि थेट वसई-विरार तर अगदी रोह्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता हक्काची मेमू मिळणार आहे. रोहेकरांचे गेले अनेक वर्षांपासून लोकलचे स्वप्न शनिवारी साकार झाले. पनवेल ते रोहा ही पहिली रेल्वे सेवा शनिवारी दुपारी चालवण्यात येईल. रेल्वेमंत्री पियूष गोयल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते रोहा रेल्वे स्टेशन येथे हा लोकर्पण सोहळा होणार आहे.

 

मध्य रेल्वेवर नाशिकमार्गे धावणारी राजधानी एक्स्प्रेस पेणपर्यंत असणारी मेमू गाडी रोह्यापर्यंत धावणार आहे. यासह मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अनेक सुविधांचे उद्घाटन शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, वसई रोड-दिवा-पनवेल-पेण या दरम्यान मेमूच्या ८ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. आता पेणपर्यंत असणारी हीच गाडी आजपासून रोह्यापर्यत धावेल. तसेच पुणे-कर्जत पॅंसेंजर गाडीही पनवेलपर्यंत चालवण्यात येईल. सकाळी ७ ते १० च्या दरम्यान पनवेलकडे जाण्यासाठी आणि सायंकाळी ४ ते १० दरम्यान पनवेलहून रोह्याकडे येण्यासाठी तासाभराच्या फरकाने एक एक ट्रेन उपलब्ध करण्यात आली तरच पनवेलकरांसाठी यासेवेचा लाभ होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@