आता आवाज फक्त बाळासाहेबांचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत असलेला 'ठाकरे' चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असून हिंदीसोबत मराठीमध्येही याचे डबिंग करण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा मराठीतील सचिन खेडेकर यांच्या आवाजाला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली होती. त्यानंतर, प्रेक्षकांच्या मागणीनंतर चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांच्याकडून आवाज बदलण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, आता चित्रपटाचा ट्रेलर नव्या आवाजात प्रदर्शित केला असून त्यात बाळासाहेबांच्या गर्जनेची अनुभूती येत आहे. तसेच, हिंदीमध्ये मात्र बाळासाहेबांची भूमिका साकारत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दकीचा आवाज कायम ठेवण्यात आला आहे.

 
 
 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चरित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनला आहे. बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दकी यांनी साकारली आहे, तर मीनाताई ठाकरे यांची व्यक्तिरेखा अमृता राव यांनी साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले आहे. तसेच, चित्रपटाची निर्मिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या 'राऊटर्स' कंपनीने केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा मेक अप आणि त्याच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्यातरी कुठलीही अधिकृत माहिती नसली तरी मराठीमध्ये प्रसिद्ध मिमिक्री कलाकार चेतन शशितल यांनी बाळासाहेबांचा आवाज दिल्यादिल्याची सूत्रांची माहिती आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@