अभिमानास्पद; खो-खोमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2019
Total Views |



१७ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही विभागात महाराष्ट्राला सुवर्णपदक

 

पुणे : शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत १७ वर्षाखालील खो-खोमध्ये महाराष्ट्राने मुले व मुली या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकले आहे. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अलाहिदा डावानंतर दिल्लीचे आव्हान १९-१७ असे परतविले. तर मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर १९-८ असा दणदणीत विजय मिळविला.

 

मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र व दिल्लीमधील हा सामना कमालीचा रंगतदार झाला. महाराष्ट्राने पूर्वार्धात ७-५ अशी आघाडी घेतली होती, तथापि दिल्लीने पूर्ण वेळेत १२-१२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना अलाहिदा डावावर गेला. या डावात महाराष्ट्राच्या जान्हवी पेठे हिने शेवटची दोन मिनिटे नाबाद पळती करीत संघास सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले.

 

महाराष्ट्राकडून किरण शिंदे (पहिल्या डावात ३ मि. २० सेकंद), अश्विनी मोरे (पहिल्या डावात २ मि. दुसऱ्या डावात २ मि. ५० सेकंद), जान्हवी पेठे (पहिल्या डावात १ मि. ४० सेकंद, दुसऱ्या डावात १ मिनिट व अलाहिदा डावात नाबाद २ मिनिटे व एक गडी) यांनी उल्लेखनीय खेळ केला. त्यांना कर्णधार दीक्षा सोनसूरकर (१ मि. १० सेकंद व ५ गडी), श्रुती शिंदे (साडेतीन मिनिटे व एक गडी) यांनी चांगली साथ दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@