भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2019
Total Views |

ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक मालिकाविजय


 
 
मेलबर्न : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी आणि ४ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने मेलबर्न वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिकाविजयाला गवसणी घातली आहे. निर्णायक क्षणी महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवने केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.
धोनीने ११४ चेंडूत ८७ धावा केल्या ,तर केदार जाधवने ५७ चेंडूत ६१ धावा करत त्याला चांगली साथ दिली.
 
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १५ धावांवर रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. रोहितने ९ धावा केल्या. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने डाव काहीसा सावरला मात्र संघाची धावसंख्या ५९ असताना शिखर (२३ धावा) बाद झाला आणि सारी मदार विराट व महेंद्रसिंग धोनीवर आली.
 
धोनी आणि विराटने संयमी खेळी करत भारताला शंभरीपार नेले. विराट ४६ धावा करून बाद झाला. त्यानंतर धोनीने डावाची सूत्रे हाती घेतली आणि केदार जाधवच्या साथीने विजयाच्या दिशेने कूच केली. या दोघांनीही १२१ धावांची भागिदारी रचली. धोनी आणि केदारने सुरेख फलंदाजी करत भारताला २३१ धावांचे लक्ष्य गाठून दिले. धोनीने ११४ चेंडूत ८७ आणि केदार जाधवने ५७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली.
 
तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा मालिकाविजय मिळवत ऑस्ट्रेलियात नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध मिळवलेला भारताचा हा पहिलाच मालिकाविजय ठरला आहे. कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर वनडेतही कांगारूंना धूळ चारत भारताने खडतर अशा दौऱ्याची यशस्वी सांगता केली आहे.
win
@@AUTHORINFO_V1@@