हवाई क्षेत्र बनणार महाराष्ट्राच्या विकासाचे इंजिन : राज्यपाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2019
Total Views |
 

मुंबई : हवाई क्षेत्र हे भविष्यकालीन प्रगती आणि विकासाचे इंजिन बनेल, सा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी मुंबईत पहिल्या जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेच्यामारोप सत्रात बोलत होते. 

ते म्हणाले की, “ जागतिक विमान वाहतूक उद्योग हा वेगाने विस्तारत आहे आणि आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत विमान प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत शंभर टक्क्यांनी वाढ होणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंदाजानुसार पुढील दोन दशकांमध्ये विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या .१२ अब्ज होईल. यामुळे गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या बऱ्याच संधी उपलब्ध होतील, तसेच या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासणार आहे.

 

नागरी उड्डाण क्षेत्र हे पंतप्रधानांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या स्वप्नाला बळ देण्याचे काम करेल . काबुल आणि मुंबई दरम्यान सुरू झालेल्या एका मालवाहतूक विमान सेवेमुळे काबूलहून मुंबईकडे सफरचंदांची तर मुंबईहून काबुल कडे टोमॅटोची वाहतूक शक्‍य झाली असून याचा दोन्ही देशांना फायदा झाला आहे. असे अनेक मार्ग शोधण्याची सूचना त्यांनी केली.

 

पर्यटन आणि हवाई क्षेत्र हे परस्परपूरक असून दोन्ही मध्ये रोजगार आणि उत्पन्न निर्मितीच्या बऱ्याच संधी आहेत . पर्यायी इंधनाच्या संशोधनावर भर देण्याची गरज ही यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली आणि विमान इंधनाकडून जैव इंधनाकडे आपण वाटचाल केली पाहिजे असे ते म्हणाले. राज्यपालांनी सुचवले की जागतिक हवाई परिषद दरवर्षी महाराष्ट्रात भरवण्यात यावी. यावेळी बोलतांना नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी हवाई क्षेत्रातील सर्व भागधारकांना नागरिकांचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले.

 

यावेळी बोलताना नागरी उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा म्हणाले की या समितीद्वारे भविष्यासाठी रूपरेषा तयार करण्याचे काम केले आहे जी पुढील चार वर्षे मदत करेल भारत हा लवकरच जगातील तीन प्रमुख हवाई बाजारपेठांपैकी एक असेल. विमान वाहतूक क्षेत्रात बदल घडवण्यासाठी विमान उत्पादन, ड्रोन उत्पादन आणि इतर तंत्रज्ञानात बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली यावेळी अनेक देशांचे नागरी उड्डाणमंत्री, नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव आर एन चौबे, फिक्कीचे अध्यक्ष संदीप सोमानी आणि उद्योग क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@