अमेरिकेत उपचार घेणाऱ्या जेटलींचे विरोधकांवर टीकास्त्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. मात्र, सोशल मीडियाद्वारे ते भारतीय राजकारणात सक्रीय आहेत. जेटली यांनी गुरुवारी त्यांच्या ब्लॉगद्वारे कॉंग्रेसवर निशाणा साधन राफेल करार ते लोकसभा निवडणूकीतील कॉंग्रेसच्या मुद्द्यांचा चांगलाच समाचार घेतला. केवळ आपल्या स्वार्थासाठी कॉंग्रेस एनडीएला सत्तेत येण्यापासून रोखत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

कॉंग्रेसवर निशाणा साधत जेटली म्हणाले कि, काही लोकांचा जन्म हा केवळ राज्य करण्यासाठी झाला आहे, अशी त्यांची समज आहे. काही लोक डाव्या विचारांचे आहेत. त्यांना एऩडीएमध्ये आम्ही सामाविष्ठ करू इच्छित नाही.,

 

सरकारच्या कल्याणकारी योजना विरोधकांना खुपतायत : जेटली

 

मोदी सरकार समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या हितासाठी विविध लोकहीताच्या योजना आणत आहे. मात्र, त्यावरही कॉंग्रेसला आपत्ती आहे. नोटाबंदी, सवर्णीयांना १० टक्के आरक्षण, जीएसटी, राफेल करार आदी प्रकरणांवरून केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप लावण्याचे काम विरोधक करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

 

कॉंग्रेस खोटे बोलणारा पक्ष

 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकारचा दृषप्रचार करण्याचे काम कॉंग्रेस करत आहे. संसदेतील चर्चेत तोंडघशी पडल्यावरही त्यांनी राफेल कराराबाबत खोटे बोलणे थांबवले नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@