शिवस्मारकाच्या बांधकामाला स्थगिती : सर्वोच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : समुद्रात भव्यदिव्य स्वरूपात तयार होणाऱ्या बहुचर्चित शिव स्मारकाच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणवाद्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना या स्मारकाचे काम थांबण्याचे आदेश देण्यात आले. याची नोंद घेण्याची विनंती याचिका कर्त्यांच्या वकिलांनी सरकारला केली होती. त्यानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवस्मारकाचे काम तुर्तास थांबवण्याचे लेखी आदेश कंत्राटदाराला दिले आहेत.

 

मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात आली होती. १६.८६ हेक्टरच्या खडकाळ परिसरात हे स्मारक उभारले जाणार आहे. मात्र, हे स्मारक उभारल्यामुळे समुद्रातील जलचर आणि जैवविविधतेला धोका उत्त्पन्न होईल, असा आक्षेप पर्यावरणवाद्यांनी घेतला होता. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. ही याचिका विचारात घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला तोंडी आदेश दिले होते. परिणामी सरकारला शिवस्मारकाचे काम थांबवावे लागले आहे.

 
राज्य सरकारने शिव स्मारकासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार बहुराष्ट्रीय कंपनी 'एल अँड टी'ला या स्मारकाचे काम करण्यासाठी १४४ कोटी रुपये मंजूर करून कामाला सुरुवात करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@