ट्रक आणि बसच्या अपघातात ६ विद्यार्थींनी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |
 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली गावानजीक पाच किलोमीटरवर असलेल्या गुरुपल्ली गावाजवळ बुधवारी ट्रक व बसची जोरदार धडक झाली असून यात सहा विद्यार्थीनींचा मृत्यू झाल्याचे प्रार्थमिक वृत्त आहे. या अपघाता दरम्यान अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती घटनास्थळावरून हाती लागत आहे.

 
दरम्यान, जखमींवर एटापल्ली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बचाव पथकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी सकाळी गडचिरोलीतील एटापल्लीनजीक बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. यात सहा विद्यार्थीनींचा मृत्यू झाला आहे.
 
 
ही धडक इतकी भीषण होती की या दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. बसमध्ये काही प्रवासी अडकले होते त्यांना वाचवण्याचे काम सध्या सुरू आहे. सकाळी या विद्यार्थीनी शाळेच्या वेळेत निघाल्या असताना हा अपघात घडला.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@