शनिवारी म.रे.वर धावणार पहिली राजधानी एक्सप्रेस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला जोडण्यासाठी मध्य रेल्वेने आणखी एक नवीन राजधानी एक्सप्रेस चालू केली आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार असून, कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाँसी आणि आग्रा कॅंटोन्मेटमार्गे दिल्लीला जाणार आहे. दर आठवड्याच्या बुधवारी आणि शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी २.२० मिनिटांनी सुटेल.

 

सध्या दोन राजधानी एक्सप्रेस दिल्लीसाठी रावण होतात, पण त्या पश्चिम रेल्वे मार्गावरून जातात. मुंबई आणि पालघरमार्गे त्या सरळ गुजरातमध्ये प्रवेश करतात. गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेवरून दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई ते दिल्ली दरम्यान पंजाब मेल धावते. पण या गाडीने मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी २६ तासांचा कालावधी लागतो. नवी राजधानी एक्स्प्रेस दर बुधवारी आणि शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल. तर नवी दिल्ली स्थानकावरून ही गाडी गुरुवारी आणि रविवारी सुटेल.

 

दिल्ली ते मुंबई हे अंतर ही गाडी २० तासांमध्येच पूर्ण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी २.२० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० मिनिटांनी ती दिल्लीला पोहोचेल. दिल्लीहून हजरत निजामुद्दीन स्थानकावरून ही गाडी ३.४५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेल. दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या गाड्या कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाँसी आणि आगरा कॅंटोन्मेट या स्थानकांवर थांबेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@