बेस्टनंतर वाजू शकते पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचे बिगुल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |



मुंबई : बेस्टच्या ९ दिवसाच्या ऐतिहासिक संपानंतर आता पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचे बिगुल वाजण्याचे संकेत कामगार नेते शशांक राव यांनी दिले आहेत. मुंबई महानगर पालिकेत गेल्या ५ वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी संप करायचा का, या मुद्द्यावर फेब्रुवारीत पालिका कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार असून कामगारांचा जो कौल असेल त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती शशांक राव यांनी दिली आहे.

 

दरम्यान, गेल्या ९ दिवसांपासून चाललेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप बुधवारी मागे घेण्यात आला. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक संप झाला. दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे पुत्र आणि कृती समितीचे नेते शशांक राव या ऐतिहासिक संपाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांनीच आता पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचे संकेत दिल्याने आणखी एका संपाला मुंबईकरांना सामोरे जावे लागणार, अशी दाट शक्यता आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@