क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी 'खेलो इंडिया' महत्वाची भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |



पुणे - देशाच्या कानाकोपऱ्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी 'खेलो इंडिया' युथ गेम्स स्पर्धा महत्वाची भूमीका बजावेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. खेलो इंडिया स्पर्धेला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या समन्वयक राणी व्दिवेदी उपस्थित होत्या.

 

सुभाष भामरे सांगितले, "खेलो इंडिया स्पर्धेला भेट देताना मला विशेष आनंद होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खेलो इंडिया उपक्रम सुरू झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळत आहे. या क्रीडा महोत्सवातून अनेक खेळाडूंना चालना मिळेल, भावी खेळाडू घडतील आणि क्रीडा संस्कृती बळकट होण्यास मदत होईल."

 

देशातील कानाकोपऱ्यातील गुणवत्ताधारक खेळाडू निवडण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होणार आहे. या स्पर्धेचे चांगले नियोजन केले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकाचे सर्व निकष या स्पर्धेचे आयोजन करताना पाळण्यात आले आहेत. हेल्थ इज वेल्थ, गुड हेल्थ इज ब्लेसअसे सांगत सुदृढ शरीराबरोबरच सुदृढ मनही आवश्यक असून सुदृढ पिढी घडविण्यासाठीही या स्पर्धेचा उपयोग होईल, असा विश्वासही भामरे यांनी व्यक्त केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@