पंड्या आणि राहुलवर कारवाई सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |



मुंबई : "कॉफी विथ करण" या शोमध्ये महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. हे दोन्ही क्रिकेटपटूंचे याआधीच चौकशी होईपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. या दोघांनी मंगळवारी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्याकडे त्यांची बाजू मांडली. बीसीसीआयने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देताना दोन्ही क्रिकेटपटूंनी बिनशर्त माफी मागितली. यानंतर पांड्या आणि राहुलने जोहरींशी फोनवरून आपली भूमिका स्पष्ट केली.

 

"कॉफी विथ करण" या कार्यक्रमामध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी वैयक्तिक आयुष्य आणि महिलांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. यानंतर दोन्ही खेळाडूंवर टीकेची झोड उठली. वाद वाढल्यानंतर या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आले आणि त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दोघांच्या पुन्हा क्रिकेट खेळण्याबद्दल निर्णय होणार आहे. तोपर्यंत हे खेळाडू कोणत्याच प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही.

 

पंड्याने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे ; हार्दिक पांड्याचे वडील

 

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे तो चांगलाच गोत्यात अडकला आहे. त्याला ऑस्ट्रेलियासोबतच न्यूझीलंडच्या एकदिवसीय मालिकेतूनही वगळण्यात येऊ शकते. त्याच्या चौफेर टीकेचा मारा केला जात आहे. या प्रकरणाने गंभीर रुप घेतले आणि त्यांच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली. अशामध्ये हार्दिक पांड्याच्या वडिलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, "ऑस्ट्रेलियातून परत आल्यापासून हार्दिकने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. तो कोणाचेही कॉल्स घेत नाही. कार्यक्रमामध्ये केलेल्या व्यक्तवावरुन तो स्वतःच खूप नाराज आहे आणि पुन्हा अशी चूक करणार नाही. आम्ही मात्र त्याच्याशी या विषयावर बोलणं टाळतो. त्याचा मोठा भाऊ क्रुणालनेही त्याच्याशी या विषयावर चर्चा केली नाही."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@