राजकीय जाहीरातींसाठी फेसबुकचे धोरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |
  

सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुक २०१९ च्या निवडणूकांपूर्वी राजकीय जाहीरातींसाठी नियमावली जाहीर करणार आहे. मंगळवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. भारत, नायजेरीया आणि युरोपातील काही देशांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी ही नियमावली लागू होणार आहे.

 

२०१६ पासून जगातील प्रमुख सोशल मीडियाकंपनी बनलेल्या फेसबुक इनकोर्पोरेशन राजकीय पक्षांच्या जाहीराती आणि फेक न्यूजचा प्रसार करण्यासाठी बदनाम झाले आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी आता नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

 

२०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये सोशल मीडियाचा महत्वाचा वाटा आहे. महिन्याभरात भारतात फेसबुक निवडणूकांसाठी जाहीराती घेण्यास सुरुवात करणार आहे. या जाहीरातीतील मजकूराचीही पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, फेसबुक आता पत्रकारिता क्षेत्रातही गुंतवणूक करणार असून मंगळवारी या बाबत घोषणा करण्यात आली. येत्या तीन वर्षात २ हजार कोटींची गुंतवणूक करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@