पालच्या सरपंचपतीची दबंगगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |

ग्रामसभा सार्वजनिकजागी घेण्यास विरोध


 
भुसावळ, १७ जानेवारी
रावेर तालुक्यातील पाल येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारीची ग्रामसभा सार्वजनिक ठिकाणी घ्या. अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि ग्रामसेवकाला देण्यासाठी गेले. परंतु सरपंचांनी आलेल्या ग्रामस्थांचे निवेदन न स्विकारता ग्रामसेवकाला द्या असे टोलवून कार्यालयातून निघून गेले. ग्रामसेवकाला निवेदन दिल्यानंतर सरपंच पतींनी ग्रा.पं.कार्यालयात येवून दिलेले निवेदन ग्रामसेवकाच्या अंगावर फेकून आलेल्या ग्रामस्थांना अर्वाच्च बघून घेईल असे बोलून निघून गेले.
 
 
ग्रामस्थांनी २६ रोजी होणारी ग्रामसभा ही ग्रामपंचायतमध्ये न घेता गावाच्या मध्यभागी पिण्याच्या पाणी टाकीजवळ सकाळी १० वा. सार्वजनिक ठिकाणी घ्या. अशा मागणीचे निवेदन बुधवार रोजी महिला सरपंच हजरा कामील तडवी यांच्याकडे देण्यासाठी ग्रा.पं.कार्यालयात गेले. त्या ठिकाणी सरपंच तडवी यांनी ग्रामस्थांचे निवेदन न स्विकारता ,तुम्ही हे निवेदन मला न देता ग्रामसेवक दिलीप तडवी यांना द्या, असे बोलून सरपंच तडवी ग्रा.पं.कार्यालयातून निघून गेल्या. ग्रामस्थांनी ग्रामसेवक दिलीप तडवी यांना निवेदन दिले. निवेदन देतेवेळी दिनेश चव्हाण, सुधाकर पवार, करणसिंग जाधव, तुळशिराम चव्हाण, छगन राठोड, करणसिंग पवार, अनिल लोहार, शेख अलीम, शेख आकीब, नंदकिशोर भिलाला उपस्थिती होते. ग्रामस्थ आणि ग्रामसेवकामध्ये चर्चा सुरु असताना सरपंच पती ग्रा.पं.सदस्य कामील तडवी ग्रा.पं.कार्यालयात आले. त्यांच्यासोबत उपसरपंच राजू एकनाथ चौधरी, सदस्य इतबार सुजान तडवी होते. सरपंच पती ग्रा.पं.कार्यालयात आल्यानंतर ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी दिलेले निवेदन वाचून संतापात ग्रामसेवक दिलीप तडवी यांच्या अंगावर निवेदन फेकून दिले. ग्रामस्थांकडे बघून सार्वजनिक ठिकाणी ग्रामसभा वगैरे काही होणार नाही, कोण काय करणार? हे मी बघून घेईल आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन निघून गेले. सरपंच पतीची दबंगगिरी पाहून ग्रामस्थ आश्‍चर्यचकीत झाले. या प्रकाराबाबत रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होवू शकला नाही.
@@AUTHORINFO_V1@@