अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : बुधवारी बेस्ट संपावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आंदोलकांना संप तासाभरात मागे घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार संप मागे घेण्यास कृती समिती तयार झाली आहे. बुधवारी दुपारपर्यंत बस नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणार आहेत. बेस्ट प्रशासनाने मान्य केलेल्या १० मुद्द्यांवर सहमती झाली. नऊ दिवसांपासून सुरु असलेला बेस्टचा प्रश्न सुटण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. बेस्टच्या इतिहासातील हा सर्वात मोठा संप मानला जात आहे. 

 

"संपकऱ्यांनी संप आधी मागे घ्यावा आणि उच्चाधिकार समितीने सुचविलेल्या ६ मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी कृती समितीने पुढे यावे." असे बेस्ट प्रशासने सांगितले. "जानेवारी २०१९ पासून १० टप्प्यात वेतनवाढ लागू करा. तसेच, अंतिम तडजोडीसाठी प्रशासनाला तीन महिन्यांची मुदत आहे." असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या निर्देशानंतर बेस्ट संपाचा तिढा आता सुटला आहे. तर, संपकरी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होणार नाही. असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. ९ दिवसानंतर अखेर बुधवारी बेस्टचा संपला पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे, मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@