हिंदू हिताय : भाग ७ - हिंदू जागा तर देश सन्मानाने उभा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
 
एखादा हिंदूपणाची ज्वलंत भावना असलेला ज्या परखड भाषेत लिहिण्याचे धाडस करणार नाही, त्या भाषेत फ्रँकाइज गोटिए हिंदू हिताबद्दल लिहितात. जिज्ञासूंनी त्यासाठी त्यांची पुस्तके किंवा लेख वाचायला पाहिजेत.
 

मागील एका लेखात फ्रँकाइज गोटिए यांच्या नावाचा आणि लेखांचा उल्लेख केला आहे. सामान्यत: मराठी माणसांना फ्रँकाइज गोटिएचा परिचय फारसा नाही. ते जन्माने फ्रान्सिसी आहेत, धर्माने कॅथलिक आहेत आणि वृत्तीने भारतीय हिंदू आहेत. “मी हिंदू आहे,” हे ते अभिमानाने सांगतात. वयाच्या १९ व्या वर्षी ते भारतात आले, पाँडिचेरीच्या योगी अरविंदांच्या आश्रमात राहिले. आध्यात्मिक वातावरणाचा त्यांच्या जीवनावर फार खोलवर परिणाम झाला. भारतात येण्यापूर्वी, हिंदू म्हणजे काय? त्यांचा धर्म म्हणजे काय? त्यांचे जगणे कसे असते? याबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, हिंदूंविषयी जेवढी विकृत माहिती पाश्चात्त्य देशांना असते, तेवढी माहिती त्यांना होती. हळूहळू या विकृत माहितीची जागा सुकृत माहितीने घेतली. त्याचा प्रवास कसा झाला, हेदेखील ते सांगतात. जिज्ञासूंनी त्यासाठी त्यांची पुस्तके किंवा लेख वाचायला पाहिजेत.

 

एखादा हिंदूपणाची ज्वलंत भावना असलेला ज्या परखड भाषेत लिहिण्याचे धाडस करणार नाही, त्या भाषेत फ्रँकाइज गोटिए हिंदू हिताबद्दल लिहितात. २०११ साली त्यांनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक आहे, ‘झोपलेल्या हिंदूंनो जागे व्हा!’ त्या लेखात ते म्हणतात, “सोनिया गांधी यांच्या सत्तेखाली ख्रिश्चॅनिटी भारत कसा काबीज करीत चालली आहे, हे पाहून अस्वस्थ व्हायला होते. २००१ च्या जनगणनेप्रमाणे भारतात ख्रिश्चनांची संख्या आहे, २.३४ दशलक्ष, एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के इतकीदेखील ही लोकसंख्या नाही. असे असले तरी, पाच राज्यांचे मुख्यमंत्री ख्रिश्चन आहेत. (२०११ ची स्थिती) सोनिया गांधी यांच्या सभोवतालचे विश्वासू एकतर मुसलमान आहेत किंवा ख्रिश्चन आहेत. हिंदूंवर त्यांचा विश्वास नाही. अंबिका सोनी ख्रिश्चन आहेत. काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी आहेत, ऑस्कर फर्नांडिस केंद्रीय मंत्री आहेत. मार्गारेट अल्वा महाराष्ट्राच्या प्रभारी आहेत. ए. के. अ‍ॅण्टोनी कर्नाटकचे प्रभारी आहेत. वाल्सन थंपू, जॉन दयाल, कांचा इलाया हे सर्व प्रखर हिंदूद्वेष्टे आहेत. ते सरकारच्या महत्त्वाच्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. या नावात अजित जोगी, दिग्विजय सिंग, प्रणव रॉय, अरुंधती रॉय यांचा समावेश करायला पाहिजे.”

 

गोटिए पुढे म्हणतात, “भारतात धर्मप्रचाराचे काम चार हजारांहून अधिक विदेशी मिशनरी करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्रिपुरात एकही ख्रिश्चन नव्हता, आता त्यांची संख्या एक लाख, वीस हजार झालेली आहे. अरुणाचल प्रदेशात १९६१ साली १,७१० ख्रिश्चन होते. आज त्यांची संख्या १.२ दशलक्ष झालेली आहे आणि ७८० चर्चेस आहेत. आंध्र प्रदेशात दर दिवशी एक चर्च खेड्यात उभे राहात आहे.” उत्तर पूर्वेकडील राज्यातील फुटीरतावादी चळवळी ख्रिश्चन चळवळी आहेत. उदा. मिझो आणि बोरो. ते मिशनऱ्यांशी हात मिळवून काम करीत असतात. केरळमधील किनारपट्टीच्या राज्यांत चर्चेसमधून चमत्कार करणारे डबे ठेवलेले असतात. आपली कोणती इच्छा आहे, हे एका कागदावर लिहून त्या पेटीत टाकायचे. कोणाला बोट हवी असते, कोणाला पक्के घर हवे असते, कोणाला मुलांची शाळेची फी भरायची असते. काही आठवड्यात चमत्कार होतो आणि त्याला या वस्तू मिळतात. ज्याला मिळाल्या त्याचा परिवार ख्रिश्चन होतो. ख्रिश्चन नागा दहशतवादी हिंदूंना वेचून वेचून ठार मारतात. आसाम आणि मणिपूर येथील उद्रेकात गेल्या २० वर्षांत २० हजारांहून लोकं ठार झालेली आहेत.”

 

या लेखात एके ठिकाणी सोनिया गांधी यांचे म्हणणे दिलेले आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषदेपुढे भाषण करताना सोनिया गांधी म्हणाल्या, “धर्मांध शक्तीविरुद्ध वैचारिक संघर्षाच्या लढाईशी आम्ही बांधिल आहोत. या शक्ती आमची विविधता नष्ट करण्याच्या मागे लागलेल्या असून धार्मिक आधारावर त्या समाजाचे ध्रुवीकरण करतात. काही पक्ष यांचा पाठपुरावा करीत आहेत. तसेच संघर्षाची भूमिका घेत आहेत. याचवेळी देशातील काही राज्यांच्या राजवटी धर्मांध शक्तींना खतपाणी घालताना दिसतात.” गोटिए प्रश्न करतात की, “सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस धर्मांध शक्ती प्रबळ करीत चाललेली आहे, ही वास्तविकता आहे. सर्व ठिकाणी ख्रिश्चन, मुस्लीम आणि मार्क्ससिस्ट यांच्या नियुक्त्या होताना दिसतात. मिशनऱ्यांना मुक्त संचार देण्यात आलेला आहे आणि त्याच वेळी ख्रिश्चन आणि मुस्लीम, दलितांना आरक्षण देण्याची चालही रचण्यात आली आहे.”

 

हिंदूंना जागे करण्यासाठी लेखाच्या शेवटी गोटिए लिहितात, “माझा देश फ्रान्स, ख्रिश्चन बहुसंख्य देश आहे. त्या देशात राज्यशक्तीच्या अनेक स्थानी हिंदू असणे किंवा भारतीय असणे हे माझ्या देशात अजिबात सहन केले जाणार नाही. त्याचवेळी निवडून न आलेली, फ्रेंच नसलेली, ख्रिश्चन नसलेली कोणतीही व्यक्ती माझ्या देशात सर्वसत्ताधीश होऊच शकत नाही. भारतात सोनिया गांधी झालेल्या आहेत. भारतातील काही लोक म्हणतात की, “ख्रिश्चन सोनिया गांधींना आम्ही स्वीकारलेले आहे, हे भारताचे मोठेपण आहे. परंतु, माझ्या मते हे मोठेपण नसून ही दुर्बलता आहे आणि ती तिरस्करणीय आहे. १०० कोटी देशांच्या लोकांत आम्हाला एकही लायक नेता मिळू नये? आम्ही सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन भारताकडे तर वाटचाल करीत नाही ना? तसे झाल्यास ही केवळ भारताची हानी असेल, असे नाही, तर जगाचीदेखील हानी असेल. जिवंत आध्यात्मिकता असणारा जगाच्या पाठीवरील भारत हा एकच देश आहे.”

 

फ्रँकाइज गोटिए यांच्या लेखातील जास्तीत जास्त भाग इथे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. लेख जरी २०११ सालचा असला तरी, हे संकट आज टळलेले नाही. फ्रँकाइज गोटिए यांना हिंदूंचा कळवळा घेऊन एवढ्या पोटतिडकीने लिहिण्याचे तसे पाहिले तर काही कारण नाही. आपल्या डोळ्यादेखत सनातन भारत आपली ओळख पुसत चालला आहे, हे त्यांना बघवले गेले नसावे आणि म्हणून त्यांनी एवढ्या घणाघाती भाषेत हा लेख लिहिलेला आहेकाँग्रेस हा फार जुना पक्ष आहे. त्याला उभे करण्यात लोकमान्य टिळकांनी आपली हयात घालवली. सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात काढली. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. सरदार वल्लभभाई पटेल क्षणश: आणि कणश: या पक्षासाठी झिजले. अगणित लोकांनी कारावास स्वीकारला. इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या, उघड्या डोळ्यांनी आपले संसार उद्ध्वस्त होताना पाहिले. कारण, ती काँग्रेस ‘राष्ट्रीय काँग्रेस’ होती. राष्ट्राचा राष्ट्रीय विचार करणारी काँग्रेस होती. राष्ट्राचा राष्ट्रीय विचार सनातन धर्माला सोडून करता येत नाही. योगी अरविंद सांगून गेले की, “सनातन धर्म आणि राष्ट्रवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून धर्मजागरणाचे काम केले, महात्मा गांधीजींनी पण तेच काम केले. दोघांनी गीतेचा अर्थ वेगळा लावला हा विषय वेगळा, परंतु चळवळीचा आधार गीता केला. याच काँग्रेसच्या वृद्धीसाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंडित नेहरूंनी ११ वर्षे तुरुंगात काढलेली आहेत. त्यांनीही आपल्यापरीने सनातन भारताचे आकलन करून घेतले होते आणि भविष्यातील भारताचे स्वप्न पाहिले होते.

 

यापैकी कोणीही हे स्वप्न पाहिले नाही की, आपला देश विदेशी परधर्माच्या महिलेच्या अधिपत्याखाली आपल्याच संमतीने दहा वर्षे जाईल. यापैकी कुणीही स्वप्न पाहिले नव्हते की, राष्ट्राचा विचार करणारी काँग्रेस भविष्यात फक्त एका घराण्याला सत्तेवर कसे बसवायचे, याचा विचार करणारी काँग्रेस होईल. यापैकी कोणीही हे स्वप्न पाहिले नव्हते की, हीच काँग्रेस समाजाचे जातीपातीत विभाजन करील, धर्मगटात तिचे तुकडे करील, हिंदू समाजाशी शत्रुत्वाची भूमिका घेणार्‍या धर्मगटांना सत्तेच्या महत्त्वाच्या जागा देईल. हे असे का घडले? एकट्या सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार कितीही शक्तीशाली असला तरी यापैकी एकही गोष्ट ते करू शकत नाहीत. त्यांना शक्ती देण्याचे काम झोपी गेलेला हिंदू समाज करीत असतो. त्यात तुम्ही, मी आणि सर्वजण येतात. म्हणून आपण जागे झाले पाहिजे, क्षणभर जागे होऊन कामाचे नाही. कायम जागे असले पाहिजे आणि आपल्या हितरक्षणाची डोळ्यात तेल घालून चिंता केली पाहिजे.

 

आपण झोपलो की, आपले नशीब झोपून राहते. प्रगती करण्याची सर्व शक्ती असतानादेखील एक तरुण काही उद्योग करीत नाही, कष्ट करीत नाही, माझ्या नशिबी काही नाही म्हणून नशिबाला दोष देत राहतो. एकदा त्याची साधूशी भेट होते. साधूला तो आपले रडगाणे सांगतो. साधू त्याला म्हणतो,“तुझे नशीब एका पर्वताच्या एका गुहेत झोपलेले आहे. त्याला जाऊन जागे कर.” नशिबाचा शोध घेण्यासाठी तो चालू लागतो. थकून एका आंब्याच्या झाडाखाली बसतो. घरची आणलेली चटणी-भाकरी खाऊ लागतो. त्याच्या पुढे एक आंबा पडतो. आंबा उचलून तो खाऊ लागतो. आंबा निघतो कडू. म्हणून तो फेकून देतो. तो जायला निघतो. आंब्याचे झाड त्याला म्हणतं, “तुझ्या नशीबाला विचार, माझी फळे कडू का होतात?” तो म्हणतो,”ठीक आहे.” वाटेत त्याला घोडा भेटतो. तो एकाच जागी उभा असतो. घोडा त्याला म्हणतो,“मला माझ्या जागेवरून हलता का येत नाही, हे तू नशिबाला विचार.” पाणी पिण्यासाठी तो नदीवर जातो. एक मोठा मासा तळमळत असतो. मासा त्याला म्हणतो,“तू नशीबाला विचार, पाण्यात राहून माझी अशी अवस्था का झाली?”

 

नशिबाला तो तरुण शोधून काढतो. नशिबाला जागं करतो. नशीब त्याला म्हणतं,“तू झोपून राहिलास म्हणून मी झोपलो, तू चालू लागलास म्हणून मी तुझ्याबरोबर चालू लागलो. आंब्याच्या झाडाखाली मोठं धन आहे, आंब्याला याचा काही उपयोग नाही. घोडा ज्या जागी उभा आहे, त्याजागी देखील धन आहे, घोड्यालाही त्याचा काही उपयोग नाही. माशाच्या पोटात सोने आहे, त्याचा माशाला काही उपयोग नाही. ते तू प्राप्त कर.” तरुण तसेच करतो. ही लोककथा आपल्याला सांगते की, आपण झोपलो की, आपले नशीब झोपते. आजूबाजूला असलेले धन आपल्याला दिसत नाही. धन असून त्याचा उपयोग केला नाही, तर त्याची कडवट फळे खावी लागतात. त्याचे भोग भोगावे लागतात. सत्तापरिवर्तन करण्याचे अफाट बळ आपल्याकडे आहे, पण आपण झोपलेलो आहोत आणि हे धन उपयोग न केल्यामुळे कडू फळ देणारे झाले आहे. सत्तर वर्षे आपण ती चाखतो आहोत. आणखी किती काळ चाखणार आहोत?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@