सावरकर साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी रोजी धुळ्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |


मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ व ३ फेब्रुवारी रोजी धुळे येथे अ. भा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष तथा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दि. २ फेब्रुवारी रोजी नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. धुळ्यातील प्रसिद्ध वास्तूविशारद रवी बेलपाठक हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर मुन्नाशेठ अग्रवाल उपाध्यक्ष आणि धुळ्यातील डिजिटल शाळांचे प्रणेते हर्षल विभांडिक सचिव म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. तसेच, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे.
 
 धुळ्यातील कान्हा रिजेन्सी, मालेगाव रोड येथे होणार्‍या या साहित्य संमेलनात हिंदुत्वनिष्ठा व एतद्देशीय, सावरकर आणि नाट्यसृष्टी, सावरकर आणि अत्याधुनिकता, सावरकर आणि समाजकारण आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तसेच, भारतीय इतिहासाबाबतचा स्वातंत्र्यवीर सावकारांचा दृष्टिकोन, गदिमा, बाबूजी आणि पु. ल. देशपांडे यांच्या मनातील सावरकर या दोन विषयांवर व्याख्याने आणि एक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असल्याचे सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी जाहीर केले आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
सावरकर साहित्य संमेलन मुंबई महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई तरुण भारत Savarkar Sahitya Sammelan Mumbai Maharashtra State Government Mumbai Tarun Bharat The meeting of Savarkar Sahitya Dhule will be held on February 2 and 3 सावरकर साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी रोजी धुळ्यात मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ व ३ फेब्रुवारी रोजी धुळे येथे अ. भा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष तथा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दि. २ फेब्रुवारी रोजी नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. धुळ्यातील प्रसिद्ध वास्तूविशारद रवी बेलपाठक हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर मुन्नाशेठ अग्रवाल उपाध्यक्ष आणि धुळ्यातील डिजिटल शाळांचे प्रणेते हर्षल विभांडिक सचिव म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. तसेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे. धुळ्यातील कान्हा रिजेन्सी मालेगाव रोड येथे होणार्या या साहित्य संमेलनात हिंदुत्वनिष्ठा व एतद्देशीय सावरकर आणि नाट्यसृष्टी सावरकर आणि अत्याधुनिकता सावरकर आणि समाजकारण आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तसेच भारतीय इतिहासाबाबतचा स्वातंत्र्यवीर सावकारांचा दृष्टिकोन गदिमा बाबूजी आणि पु. ल. देशपांडे यांच्या मनातील सावरकर या दोन विषयांवर व्याख्याने आणि एक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असल्याचे सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव र
@@AUTHORINFO_V1@@