मोदी सरकार करदात्यांसाठी घेणार मोठा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्यक्ष कराच्या रचनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत.

 

येत्या अर्थसंकल्पात जेटली प्राप्तिकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्याची शक्यता असल्याची चर्चा आता व्यक्त केली जात आहे. मध्यम वर्गीय नोकरदार वर्गाचे पाच लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

सध्याच्या नियमावलीनुसार करदात्यांचे अडीच लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. तेच आता दुप्पट करण्याची घोषणा मोदी सरकारकडून केली जाण्याची शक्यता व्य़क्त केली जात आहे शिवाय शेतकरी आणि मजूर वर्गासाठीही नव्या योजना आणल्या जाणार आहेत. मजूरांनाही ईपीएफओच्या कक्षेत आणण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.

 

  • कररचना
  • उत्पन्न प्राप्तीकर
  • अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
  • अडीच ते पाच लाखापर्यंत उत्पन्न टक्के
  • पाच ते दहा लाख उत्पन्न २० टक्के 
  • दहा लाखांहून अधिक उत्पन्न ३० टक्के

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@