रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे सुशासन संगमय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |


मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने ‘सुशासन संगमय’ या विषयावर २०-२१ जानेवारी राष्ट्रीय परिषद योजण्यात आली आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग व नीती आयोगाचे उपाध्यक्ष, डॉ. राजीव कुमार २० जानेवारी रोजी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या परिषदेत देशभरातून सुमारे अडीचशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी या दि. २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता परिषदेचा समारोप करतील, अशी माहिती प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

प्रबोधिनीच्या केशवसृष्टी, भाईंदर स्थित ज्ञान-नैपुण्य केंद्रात ही परिषद योेजण्यात आली आहे. या दोन दिवसी या परिषदेत नव भारतासाठी सुशासन, प्रजासत्ताक नवकल्पना: मोदी सरकारची सुशासनबाबत नवसंकल्पना या विषयांवरील मांडणीबरोबरच शासकीय व स्वयंसेवी क्षेत्रातील यशस्वी सुशासनावरील सादरीकरणे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचे अनुभव सर्वांसमोर मांडण्यााचे सत्रही या परिषदेत होणार आहे. नागरिकांची प्रतिबद्धता, उत्तरदायी शासन, शिक्षण क्षेत्रातील नवकल्पना अशा सुशासन संबंधित महत्त्वाच्या पैलूंवरही सादरीकरणे होणार आहेत, असे प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी सांगितले.

 

प्रबोधिनी २००८ पासून नियमितपणे जगजागरणासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहे. मुख्यत्वे- स्वयंसेवी क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक यांना त्यांचे कार्य, अनुभव, अभ्यास, योग्य पद्धती या विषयी मांडणी करण्यााची संधी या निमित्ताने मिळत आहे. आजपर्यंत स्वच्छ भारत, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया, एक देश एक निवडणूक या विषयांवर राष्ट्रीय परिषद योजण्यात आली आहे. सुशासन ही केवळ सरकारचीच जबाबदारी नाही तर नागरी समूह, नागरीक, अभ्यासक यांचेही या विषयात महत्त्वाचे योगदान असले पाहिजे. या उद्देशाने सादरीकरणे, अनुभव कथन, विषय मांडणी अशा सत्रांची रचना या सुशासन विषयक परिषदेत करण्यात आली आहे. सरकारी क्षेत्र, स्वयंसेवी क्षेत्र, लोकप्रतिनिधी विविध शैक्षणिक संस्थांचे अनुभवी व अभ्यासू प्रतिनिधी या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. नीती आयोगाचे धीरज नय्यर, राजदूत अशोक मुखर्जी, माय गव्हर्नमेंट संस्थेच्या प्रेरिता चौथाईवाले हे मान्यवर या परिषदेत विषय मांडणी करणार आहेत, असे रवींद्र साठे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रबोधिनीचे अधिकारी रवी पोखरणा हे ही उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@